आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

लोणावळा लायन्स पॉईंट रिकवरी ऑपरेशन..

खेमा बबन घुटे वय ३९ परली, रा..सुधागड, जिल्हा रायगड, असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Spread the love

लोणावळा लायन्स पॉईंट रिकवरी ऑपरेशन..खेमा बबन घुटे वय ३९ परली, रा..सुधागड, जिल्हा रायगड, असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.Lonavla Lions Point Recovery Operation..Khema Baban Ghute Age 39 Parli, Res.. Sudhagad, District Raigad, Name of deceased person.

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ३ एप्रिल.

दिनांक ३१/३/२०२३ रोजी सकाळी ११.४५ ला लायन्स पॉईंट, लोणावळा येथून शिवदुर्गला फोन आला. एक व्यक्ती दरीत पडला आहे. थोडी माहिती घेतली व लगेचच लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनला कळवले. पोलिस निरीक्षक साहेब यांनी त्वरित प्रतिसाद दिला , भारत भोसले साहेब पी.एस. आय यांच्या सह घटना स्थळी पोहचले. शिवदुर्ग रेस्कु टीम साहित्यासह पोहचली व ठिक एक वाजता काम चालू ‍केले. अर्धा पाऊण तासात बॉडी दिसली.

साधारण दोनशे मिटर रॅपलींग केल्यानंतर बॉडी दिसायला लागली त्यानंतर अजून शंभर फुटांपेक्षा जास्त अंतरावर बॉडी होती .बाकी तयारी चालू केली खाली बॉडी पॅक करण्यासाठी स्ट्रेचर व इतर साहित्य पाठवले . योगेश उंबरे, सुरज वरे यांच्या मदतीला हर्ष तोंडे खाली गेला .वर सर्व जबाबदारी महेश मसने, सचिन गायकवाड  यांनी सांभाळली.

सेट अप लावला खाली बॉडी पॅक झाली होती.
खाली बॉडी तीव्र उतारावर असल्याने बॉडी पॅकिंगला अडचणी येत होत्या.पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ साहेब, पोलिस उपनिरीक्षक. भारत भोसले यांच्या सह अनेक पोलिस कर्मचारी मदतीला होते.वर घनदाट जंगल व तीव्र उतार.या ठिकाणी टिमला थांबायला पण जागा नव्हती
बॉडी खेचण्यासाठी सुद्धा कारवीच्या जंगलामुळे अवघड होते. खालून वॉकीटॉकीवर कॉल आला व बॉडी खेचायला चालू झाले शंभर फुट खेचल्यानंतर वर खेचण्यासाठी जड जात होती. अजून जोर लावला तर जोरात आवाज होऊन रोपचा आवटर फाटला . सेट अप चेंज ओव्हर केला जूमार अजुन पुढे लावले परत ओढायला चालू केले परत जोरात आवाज झाला व परत रोप तुटला. आता काही सुचत नव्हते.
आदित्य पिलानेला खाली पाठवले काय झाले चेक करायला त्याने सांगितले रोप गुंडाळून गेला आहे. खरं वाटत नव्हते म्हणून सुनिल गायकवाड स्वत: एजपर्यंत खाली जाऊन आले . रोप भयंकर गुंडाळून त्याची गुंडाळी अडकत होती,तो गुंता काढण्यासाठी आदित्यने खुप प्रयत्न करत गुंता काढला, व नंतर अथक परिश्रमाने हळूहळू बॉडी वर आली.बॉडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली.

आजच्या शिवदुर्ग रेस्कुच्या टीममध्ये,
महेश मसने , सचिन गायकवाड सर , हर्ष तोंडे, योगेश उंबरे, सूरज वरे, योगेश दळवी, हर्षल चौधरी, आदित्य पिलाने, प्रिन्स बेठा, आयुष वर्तक, मधुर मुंगसे,वैभव राऊळ, राजेंद्र कडू,अशोक उंबरे, गणेश रौंदळ , अमित बलकवडे , सदाशिव सोनार , चंद्रकांत गाडे , अशोक कुटे, हनुमंत भोसले , केतन खांडेभरड, संतोष खोसे , अमोल सुतार ,सुनील गायकवाड या व्यक्तींनी बॉडी काढण्यात अथक परिश्रम घेतले.

खेमा बबन घुटे वय 39 परली, रा..सुधागड, जिल्हा रायगड, असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
शिवदुर्ग रेस्कु हेल्पलाईन नंबर 9822500884

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!