ताज्या घडामोडी

प्रचीतीगडास जाण्यास रस्ता मिळावा अन्यथा आंदोलन..

Spread the love

शिराळा तालुका डोंगरी विकास संघर्ष कृती समितीची मागणी

कोकरुड/ वार्ताहर

वन विभागाच्या जाचक अटींमुळे चांदोली अभयारण्य परिसरात असणारा प्रचीतगड पर्यटकांपासून तसेच शिवभक्तांपासून वंचित आहे. या ठिकाणी जाण्यास रस्ता मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शिराळा तालुका डोंगरी विकास संघर्ष कृती समितीने निवेदनाद्वारे दिला आहे.सह्याद्री व्याघ्र चे उपसंचालक उत्तम सावंत यांना डोंगरी कृती संघर्ष समितीच्या वतीने याबाबत नुकतेच निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की अभयारण्य परिसरात असणारा प्रचितगड हा छत्रपती शिवरायांनी बांधलेला जिल्ह्यातील एकमेव शिवगड आहे. हा गड आमचा अभिमान व स्फूर्तिस्थान आहे. या ठिकाणी भवानीमातेचे मंदिर आहे.त्यामुळे हे ठिकाण आमच्या श्रद्धेचे स्थान आहे. आपल्या जाचक अटी व नियमानमुळे आम्हा शिवप्रेमींना त्या ठिकाणी जाण्यास अडचण निर्माण होत आहे. तरी भवानीमातेच्या पूजेस नियमित जाण्याकरता वनक्षेत्रातून कायमस्वरूपी रस्ता मिळावा. जर आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर लोकशाही मार्गाने आपल्या विरुद्ध तीव्र आंदोलन करू निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह शिवभक्तांच्या सह्या आहेत.यावेळी या मागणीचे निवेदन देताना सह्याद्री व्याघ्र चे उपसंचालक उत्तम सावंत यांना देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, शेजारी संजय पाटील, संजय घोडे, अमर जाधव आदींसह उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!