आपला जिल्हाक्राईम न्युजमहाराष्ट्र

सरपंच गोपाळे खून प्रकरणात आरोपींवर खोटे आरोपकरुन; गोवण्याचा प्रयत्न. किशोर आवारे.  संस्थापक जनसेवा विकास समिती.

फोन करून संभ्रम निर्माण करणाऱ्या तालुक्यातील त्या बड्या नेत्याची चौकशी सीबीआय अथवा सीआयडी मार्फत करण्यात यावी..

Spread the love

सरपंच गोपाळे खून प्रकरणात आरोपींवर खोटे आरोपकरुन; गोवण्याचा प्रयत्न. किशोर आवारे.  संस्थापक जनसेवा विकास समिती.By falsely accusing the accused in Sarpanch Gopale murder case; Attempt to bind. Juvenile premises. Founder Public Service Development Committee.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १२ एप्रिल.

शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या  खून प्रकरणात काहींना संशयावरून अटक करण्यात आली आहे. त्या संशयित आरोपींवर राजकीय हस्तक्षेपातून खोटे आरोप ठेवण्यात आले असल्याचा दावा जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी केला. तसेच या हत्या प्रकरणातील खऱ्या आरोपींना कठोर शासन व्हावे, याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.मंगळवार (दि ११) सोमाटणे फाटा येथे पत्रकार परिषद झाली. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या कुटुंबीयांसमवेत उपस्थित असलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेस जनसेवा समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत,नीलेश पारगे, सुनील मोरे, सुनील कारंडे,वृंदा महेश भेगडे,योगिता ओव्हाळ आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार किशोर आवारे म्हणाले, गोपाळे यांच्या हत्येप्रकरणी पोलिस प्रशासनाने सहा तासानंतर गुन्हा दाखल केला. यामध्ये प्रमुख साक्षीदार असणारा एक ग्रामपंचायत सदस्य हल्ला झालेल्या ठिकाणी उपस्थित असूनही कुठल्याही मारेकरी आरोपीला ओळखले नाही, हे आश्चर्यकारक आहे.या प्रकरणातील संशयित महेश भेगडे,मनीष ओव्हाळ व अशोक कांबळे यांना खुनाचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही अटक चुकीची असून, या खुनाचे मूळ बिनविरोध झालेल्या निवडणुकीत आहे, निवडणूकीपासून या खून प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व तिथपासून तपास व्हावा.तसेच आरोपी आणि फिर्यादी अशा दोघांनाही एकाच वेळी फोन करून संभ्रम निर्माण करणाऱ्या तालुक्यातील बड्या नेत्याच्या तपासातील हस्तक्षेप झाला असून, मुद्दाम या प्रकरणात या तिघांना गोवण्यात आले असल्याचा आरोप किशोर आवारे यांनी केला. हत्याप्रकरणी आरोपी आणि फिर्यादी अशा दोघांनाही एकाच वेळी फोन करून संभ्रम निर्माण करणाऱ्या तालुक्यातील त्या बड्या नेत्याची चौकशी सीबीआय अथवा सीआयडी मार्फत करण्यात यावी अशी मागणीही यावेळी आवारे यांनी केली.

 

अजितदादा पवार म्हणाले, त्याप्रमाणे गुन्ह्याचा तपास व्हावा आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हावे असे त्यांनी सांगितले. तालुक्यातील गावा – गावातील राजकीय वाद हा राजकीय लोकप्रतिनिधीच्या वर्चस्ववादाच्या लढाईतून निर्माण होत आहे. आणि याला सर्वस्वी लोक प्रतिनिधीच जबाबदार आहेत  आणि तेच इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत.त्यामुळेच मावळातील सर्वसामान्य जनता यात भरडली जात आहे. तसेच अनेक निरपराध सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर राजकीय वैमनस्यातून खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील वातावरण पोषक व शांत कसे राहील याबाबत भान ठेवणे गरजेचे आहे असे ही आवारे यांनी सांगीतले.

यावेळी महेश भेगडे, मनिष ओव्हाळ व अशोक कांबळे यांच्या परिवारातील सदस्यांनी पोलीस यंत्रणेकडून योग्य तपास होऊन आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!