आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

कॅन्सरमुक्त मावळ अभियानांतर्गत मुलींसाठी गुरुवारी मोफत एचपीव्ही लसीकरण शिबीर..

इंद्रायणी महाविद्यालयात मुलींसाठी विनाशुल्क एचपीव्ही (ह्युमन पापिलोमा व्हायरस) लसीकरण शिबीर घेण्यात येणार असल्याचे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे

Spread the love

कॅन्सरमुक्त मावळ अभियानांतर्गत मुलींसाठी गुरुवारी मोफत एचपीव्ही लसीकरण शिबीर Free HPV Vaccination Camp for girls under Cancer Free Maval Abhiyan on Thursday

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर १२ एप्रिल.

येथील इंद्रायणी महाविद्यालयात मुलींसाठी विनाशुल्क एचपीव्ही (ह्युमन पापिलोमा व्हायरस) लसीकरण शिबीर घेण्यात येणार असल्याचे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कॅन्सरमुक्त मावळ अभियानांतर्गत गुरुवारी (दि. 13) ही मोहीम राबवली जाणार आहे.

यावेळी मेधावीन फाउंडेशनच्या संस्थापिका वैशाली दाभाडे, डाॅ रेणूका पारवे, बीबीए,बीसीए विभाग प्रमुख प्रा विद्या भेगडे,प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर तुमकर आदी उपस्थित होते.

‘ती’ च्या संरक्षण,आरोग्य आणि उज्वल भविष्यासाठी, इंद्रायणी विद्या मंदिर संस्था, कॅन्सर पेशंट एड असोसिएशन मुंबई, मेधावीन फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी सांगितले. कॅन्सरमुक्त मावळ अभियानाची ही सुरुवात असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी डॉ. रेणुका पारवे यांनी देशातील स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची आकडेवारी देत लसीकरणामुळे कॅन्सरच्या संभाव्य धोक्याला पूर्ण प्रतिबंध करता येईल, असे सांगितले. ही लस जागतिक आरोग्य संघटनेने पूर्णतः निर्धोक असल्याचे प्रमाणित केले असून मुलींनी ती घ्यावी, असे आवाहन डॉ. रेणुका पारवे यांनी केले.

इंद्रायणी महाविद्यालयातील 300 मुलींना ही लस गुरुवारी मोफत देण्यात येणार असून त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे,कार्यवाह चंद्रकांत शेटे आणि डॉ. धनंजया सरनाथ यांनी संपूर्ण व्यवस्था विनाशुल्क उपलब्ध करून दिली असल्याचे वैशाली दाभाडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!