आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा २०२३ गरवारे कॉलेज पुणे येथे संपन्न.

 वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2023 (लोककला )लोकनाट्य (तमाशा) कलावंत कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर यांना पुणे येथील गरवारे कॉलेज सभागृहात प्रवचनकार व कीर्तनकार ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे शुभहस्ते प्रदान..

Spread the love

वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा २०२३ गरवारे कॉलेज पुणे येथे संपन्न.Vai. Dr. Ramchandra Dekhne Memorial Award Ceremony 2023 concluded at Garware College Pune.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, १३ एप्रिल.

वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2023 (लोककला )लोकनाट्य (तमाशा) कलावंत कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर यांना पुणे येथील गरवारे कॉलेज सभागृहात प्रवचनकार व कीर्तनकार ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला ; स्मृतीचिन्ह, शाल ,सन्मानपत्र आणि एकवीस हजार रुपये रोख ,असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

 

व्यासपीठावर विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. त्यामध्ये वारकरी कीर्तनकार ह.भ. प. प्रमोद महाराज जगताप (कीर्तनकार पुरस्कार) ,डॉ. डी. वाय . पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील , संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आणि डॉ. भावार्थ देखणे आदी मंडळी उपस्थित होते. सभागृहात अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री आदरणीय लीला गांधी , लोकप्रिय वक्ते प्रा. मिलिंद जोशी,डॉ.रामचंद्र देखणे यांच्या मूळ गावातीलअर्थात कारेगाव ता. शिरूर येथील सरपंच,उपसरपंच,अनेक ग्रामस्थ आणि देखणे सर यांचेवर प्रेम करणारे अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदक आदरणीय आनंद देशमुख (आकाशवाणी पुणे केंद्र, निवेदक) यांनी अतिशय रसाळ वाणीत केल्याने कार्यक्रम अतिशय रंगतदार आणि तितकाच देखणा झाला.

मनोगतात प्रथम पुरस्कारार्थी म्हणून सन्माननीय रघुवीरजी खेडकर यांनी राम कृष्ण हरी म्हणत सुरुवात करत अवघ्या सभागृहाची मने जिंकली आणि थोडक्यात परंतु अतिशय नेमक्या शब्दात कृतज्ञताभाव व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. कीर्तन आणि लोकनाट्य तमाशा यांना नदीचे दोन तट संबोधत सरांच्या गोड आठवणी त्यांनी कथन केल्या .तसेच हा सन्मान माझ्या आई -वडिलांच्या उत्तम संस्कारांमुळे प्राप्त झाल्याचे नमूद केले.मला अनेक पुरस्कार मिळाले परंतु डॉ. रामचंद्र देखणे यांच्या नावाने मिळालेला स्मृती पुरस्कार मिळाल्याने माझ्या जीवनाचे सोने झाले ,असे भावोत्कट होऊन बोलले.

नंतर आदरणीय प्रमोद महाराज जगताप यांना डॉ.रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .व्यासपिठावरील सर्वच मान्यवरांनी लोकनाट्य तमाशा कलावंत आणि उत्तम प्रवचनकार म्हणून रघुवीर खेडकर यांचा विशेष उल्लेख करत मनोगताची सुरुवात राम कृष्ण हरी या मंत्राने केल्याने सारे सभागृह भारावून गेले असा उल्लेख करत ,त्यांचे वेगळेपण अधोरेखित केले. या निमित्ताने सर्वांना लोकनाट्य तमाशा कलामहर्षी तुकाराम खेडकर आणि तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला.

पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षक ,लोककला अभ्यासक आणि रघुवीर खेडकर यांच्यावर प्रेम करणारे असंख्य समूहाच्या वतीने त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!