आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी..

जयंती महोत्सव समितीतर्फै कमानी , नगरपरिषदेतर्फे आकर्षक फुलांची सजावट व विद्युतरोषणाई ! !

Spread the love

विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी,Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar’s 132nd birth anniversary was celebrated with great enthusiasm.जयंती महोत्सव समितीतर्फै कमानी , नगरपरिषदेतर्फे आकर्षक फुलांची सजावट व विद्युतरोषणाई ! !

आवाज न्यूज लोणावळा प्रतिनिधी १४ एप्रिल.

विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती लोणावळा शहरातील नगरपरिषद परिसरात महामानव , भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास  तसेच महात्मा गांधी , संत गाडगेमहाराज , क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या तसेच छञपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.

जयंती महोत्सव समितीतर्फै भैय्यासाहेब आंबेडकर कमान , माता रमाई आंबेडकर , तसेच भाजीमंडईतील कमानीला शिलाटणेच्या दोन दिवंगत शिवभक्तांच्या नावाने कै.आर्यन कोँडभर व कै.करण कोँडभर यांची नावे देण्यात आली आहेत. नगरपरिषदेतर्फे आकर्षक फुलांची सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

सकाळपासून लोणावळा शहराकडे आनेक गावातून महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेची रथामधून भव्यदिव्य वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती.
कुरवंडे , वाकसई , पाटण , औंढे खुर्द , भाजे , बोरज , तसेच रामनगर , लोणावळा शहरातील भुशीगाव , रामनगर , वलवण समतानगर , तुंगार्ली , खंडाळा , नांगरगाव , कुसगाव बुद्रूक आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आनुयायी , आर पी आय , ए गट , तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे , वंचित बहुजन आघाडी , तसेच विविध पक्ष ,संघटना यांचेकडून मिरवणुका काढून डाॕ.आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पावभाजी वाटप करण्यात आली.आर पी आय च्या वतीने माता रमाई भिमराव आंबेडकर महिला मंडळांच्या वतीने दिक्षाभूमिचे ठिकाणी अन्नदान करण्यात आले. शेकडो महिला, मुलामुलींनी , पुरूषांनी याचा लाभ घेतला.आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे , पदाधिकारी गणेश गायकवाड , तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव भालेराव , लोणावळा शहराध्यक्ष कमलशील म्हस्के , तसेच माता रमाई महिला मंडळांच्या महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या.

भोंडे हायस्कूल चे मुख्याध्यापक अमोल साळवे यांचेतर्फे , तसेच आतिश आडसुळे , आणि मिञ परिवार मावळवार्ता परिवारातर्फे भाजीमंडईतील कोपऱ्यावर थंडगार पेये वाटप करण्यात आले.जोशाबा मजूर कष्टकरी संघटना यांचेवतीने चव्हाण , तसेच कार्यकर्ते यांचेतर्फे डाॕ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

राञी महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची ढोलताशांचा गजरामधे भव्यदिव्य अशी मावळा पुतळा ते छञपती शिवाजी महाराज चौकापर्यत मिरवणूक काढण्यात आली.राञी उशिरापर्यत चार पाच मंडळातर्फे डी जे च्या तालावर हजारो आंबेडकरी आनुयायी , महिला ,मुले , मुली , आबालवृध्द यांनी वाद्याचे तालावर ठेका धरला.

राञी विचारपीठावर सभा झाली.तसेच आॕर्केस्ट्रा झाला. शहरात लोणावळा शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला होता….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!