आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणसामाजिक

प्रसिद्ध प्रवीण मसाले उद्योग समूहाच्या वतीने मावळ तालुक्यातील शासन मान्य ग्रंथालयांना ग्रंथ संच भेट !

Spread the love

प्रसिद्ध प्रवीण मसाले उद्योग समूहाच्या वतीने मावळ तालुक्यातील शासन मान्य ग्रंथालयांना ग्रंथ संच भेट !On behalf of the famous Praveen Spices Industry Group, a collection of books was presented to the government approved libraries in Maval Taluka.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी १६ जुलै.

प्रसिद्ध प्रवीण मसाले उद्योग समूहाच्या वतीने मावळ तालुक्यातील शासन मान्य ग्रंथालयांना ग्रंथ संच भेट देण्यात आला.प्रवीण मसालेवाले ट्रस्टचे संस्थापक कै. हुकमीचंदजी चोरडिया यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालय यांना ग्रंथसंच भेट देण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह  सोपानरावजी पवार साहेब, प्रवीण मसाला समूहाचे समन्वयक  काळेसाहेब, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे सहकार्य वाहक राजेंद्रजी ढमाले साहेब, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक श्री विजय कचरे सर, मावळ तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री नवनाथ जी देशमुख, दिलीप टाटिया ग्रंथालयाचे अध्यक्ष रामचंद्रजी गाढवे व मावळ तालुक्याचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रंथालय चळवळ ही वाढवली गेली पाहिजे. ग्रंथालय टिकली पाहिजेत . या सामाजिक हेतूने प्रवीण मसालेवाले ट्रस्ट समूहाने संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांना पुस्तक संच भेट दिले.मावळ तालुक्यातील शासनमान्य ग्रंथालयांना या पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले यावेळी गणेश ग्रंथालय व वाचनालय, श्री एकविरा सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, गुरव समाज सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, तुळसा सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, लोणावळा नगरपालिका वाचनालय व ग्रंथालय, वेदांत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, दिलीप भाऊ टाटिया वाचनालय व ग्रंथालय, यशवंत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आदी ग्रंथालयाचे पदाधिकारी व कर्मचारी यावेळेस उपस्थित होते.

यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह  सोपानरावजी पवार साहेब, प्रवीण मसाला समूहाचे समन्वयक  काळेसाहेब, मावळ तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष  नवनाथ जी देशमुख यांनी मार्गदर्शन केले व सूत्रसंचालन पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक श्री विजय कचरे सर यांनी केले व दिलीप टाटिया ग्रंथालयाचे अध्यक्ष रामचंद्रजी गाढवे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!