आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनसामाजिक

रोटरी क्लब तळेगाव सिटीतर्फे वैद्यकीय क्षेत्रातील सन्मानाचा” देवदूत” पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

Spread the love

रोटरी क्लब तळेगाव सिटीतर्फे वैद्यकीय क्षेत्रातील सन्मानाचा” देवदूत” पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.Rotary Club Talegaon City has concluded the “Angel” Award distribution ceremony of honor in the field of medicine.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १६ जुलै.

मावळ पंचक्रोशीत वैद्यकीय क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या एका व्यक्तीस दरवर्षी अतिशय मानाचा देवदूत पुरस्कार दिला जातो! रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 2023 24 चा देवदूत पुरस्कार वितरण सोहळा माळवाडी येथील हॉटेल ईस्टीनच्या मंगलमय दालनात संपन्न झाला.

पंचक्रोशीत वैद्यकीय क्षेत्रात सर्वोत्तम सेवा करणारे सिद्ध हस्तलेखक, कवी मनाचे उत्तम निवेदक डॉक्टर शालिग्राम भंडारी यांना यावर्षीचा रोटरी सिटीचा देवदूत पुरस्कार समारंभ पूर्वक देण्यात आला.रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून गेले अनेक वर्ष डॉक्टर शालिग्राम भंडारी कार्यरत आहेत.रोटरी सिटी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत असते, समाजाच्या विविध क्षेत्रात रोटरी सिटीचे नाव आहे असे गौरवोद्गार डॉक्टर भंडारी यांनी आपल्या मनोगताद्वारे काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष शेळके यांनी केले अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी उपक्रमाची माहिती दिली सूत्रसंचालन प्रशांत ताये व संगीता शिरसाट यांनी केले.डाॅ.शाळीग्राम भंडारी यांचा परिचय प्रकल्प प्रमुख डॉ सौरभ मेहता यांनी समर्पक शब्दांत केला,मानपत्राचे वाचन वैशाली जुन्नरकर व सेक्रेटरी भगवान शिंदे यांनी केले आभार किरण ओसवाल यांनी केले! विलास काळोखे,दिलीप पारेख,महेशभाई शहा,भरत पोतदार , दादासाहेब उ-हे,दिपक फल्ले यांनी डॉ भंडारी यांना शुभेच्छा दिल्या.

सदरप्रसंगी महाराष्ट्रसह अनेक राज्यातील गडकिल्ले सर करणाऱ्या शिरूर तालुक्यातील भांबुर्डे गावच्या आप्पासाहेब पवार यांचा लक्षवेधी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व रोटरीयन्स सदस्यांनी विशेष परिश्रम घेतलेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!