आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

सामाजिक बांधिलकीतून निराधार मुलांना चित्रपट पाहण्याची पर्वणी..

घर बंदूक बिरयानी' या चित्रपटातील कलाकारांबरोबर चित्रपटगृहात बालआश्रमातील अनाथ मुलांना चित्रपट पाहण्याची पर्वणी ..

Spread the love

सामाजिक बांधिलकीतून निराधार मुलांना चित्रपट पाहण्याची पर्वणी.Encouragement of underprivileged children to watch films through social commitment.

आवाज न्यूज :  पुणे प्रतिनिधी, १६ एप्रिल.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे हे नेहमी सामाजिक विषयावरती चित्रपट बनवतात अशी त्यांची ख्याती फिल्मइंडस्ट्री मध्ये आहे. नागराज मंजुळे यांचा “घर बंदूक बिरयानी” हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चित्रपटात स्वतः नागराज मंजुळे यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे.आपल्या मुलाबाळाबरोबर सुट्टीत चित्रपट पाहणे हे मध्यमवर्गीयांचे नियोजन, मात्र बाल आश्रमात राहणाऱ्या मुलांनाही सुट्टीत एका चित्रपटगृहात जाऊन मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचे स्वप्न असतं ही भावना ओळखूनच मावळचे युवा नेतृत्व समाजसेवक देवा भाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून नुकताच प्रदर्शित झालेला घर बंदूक बिर्याणी हा नागराज मंजुळे यांचा चित्रपट मुलांना दाखवण्याच्या हेतूने आज या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मुलांमध्ये आनंद निर्माण व्हावा त्यांच्या मनावरती चित्रपट पाहून समाधान निर्माण होणे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे देवा भाऊ गायकवाड यांनी ठरवले होते. त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन पै आण्णा मंजुळे, बाल आश्रमातूनच राहून आपले उच्च शिक्षण पूर्ण करणाऱ्या व अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या कुमारी अमृता करवंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा चित्रपट पाहण्यासाठी पुणे अंध मुलींची शाळा,सविता वाघमारे,सूर्योदय सोशल फाउंडेशन, कोमल दीक्षित सेंड क्रिस्पी मुलींची कन्या शाळा संगीता कदम, सेवा मित्र मंडळ शिरीष मोहिते, जिजाऊ फाउंडेशन ज्योती ढमाले,धार पवार प्रतिष्ठान पुणे, सागर पवार बचपन फाउंडेशन, सामाजिक कार्यकर्त्या अमृता करवंदे, सोबत सहकार्य आकाश आखरे,लखन वाघमारे यांसह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

 

निराधार,अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्यासाठी स्टार कलाकार प्रसिद्ध अभिनेता आकाश ठोसर,भूषण मंजुळे हे देखील उपस्थित होते. हा चित्रपट पाहताना त्या चित्रपटातील अभिनेत्यांबरोबर हा चित्रपट बघण्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले आहे.नागराज मंजुळे त्यांच्या ‘सैराट’नंतर दिग्दर्शकाचे कौतुक करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. कित्येक वर्षांनंतर जातीव्यवस्थेचं भयाण वास्तव नजरेसमोर आणून लोकांच्या मनात झणझणीत अंजन टाकणारी चित्रकृती केल्याबद्दल नागराज मंजुळे यांचं कौतुक कित्येकांनी केलं आहे. पण चित्रपटातून जातीपातीच्या व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या नागराजलाही समाजाने आपापल्या कुवतीप्रमाणे वाटून घेतलं आहे हे विशेष. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’सारख्या चित्रपटांमधून शाळकरी वयातील मुलांना प्रेम करायला लावतात, हा नागराजवर घेतलेला पहिला आक्षेप होता. नागराजचा चित्रपट म्हणजे जातींमधल्या संघर्षांवर थेट भाष्य असणार हे एका वर्गाने मनाशी पक्कं करून घेतलं आहे. आणि म्हणून नागराजबद्दल पूर्वग्रह बाळगणाऱ्या या समाजाने त्याच्यासारख्या दिग्दर्शकाला कोणा एका जातीचं लेबल लावून त्याच्या प्रतिभेला नाकारण्याचा प्रयत्न करू नये, हेही तितक्याच निग्रहाने दुसरा वर्ग सांगतो आहे.

घर बंदूक बिर्याणी या चित्रपटातून देखील समाज व्यवस्थेतील वास्तव नागराज मंजुळे यांच्या संवेदनशील दिग्दर्शकाने मांडलेले आहे. प्रत्यक्षात बालगृहातील निराधार,अनाथ मुलांच्या आयुष्यात एक आनंदाचा क्षण आणू शकतो आमच्यासाठी ही भावनाच महत्वपूर्ण आहे. असे यावेळी देवा भाऊ गायकवाड म्हणाले. त्यासाठीच कोथरूड येथील बालगृहामधील अनाथ मुलांना हा चित्रपट दाखवावा त्यांना आनंद देण्याच्या हेतूनेच या कार्यक्रमाचे आयोजन केले असे मत यावेळी अण्णा मंजुळे अमृता करवंदे आणि या चित्रपटातील कलाकार आकाश ठोसर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी अण्णा जोगदंड, मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेचे विकास कुचेकर हे देखील उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!