आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी भावी शिक्षकांनी ज्ञानाची उंची वाढवावी ः प्राचार्य विक्रम काळे.

माजी विद्यार्थी मेळावा, वार्षिक स्नेहसंमेलन बक्षीस वितरण समारंभ समवेत विविध कलागुणांचा ‘उडाण’ माझी वसुंधरा कार्यक्रम उत्साहात व उत्स्फुर्त सहभागात पार पडला.

Spread the love

सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी भावी शिक्षकांनी ज्ञानाची उंची वाढवावी ः प्राचार्य विक्रम काळे.To build a healthy society, future teachers should raise the height of knowledge: Principal Vikram Kale.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, १७ एप्रिल.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक व सचिव डॉ. दीपक शहा यांच्या प्रोत्साहनाने बी.एड. पदवीधारकांचा माजी विद्यार्थी मेळावा, वार्षिक स्नेहसंमेलन बक्षीस वितरण समारंभ समवेत विविध कलागुणांचा ‘उडाण’ माझी वसुंधरा कार्यक्रम उत्साहात व उत्स्फुर्त सहभागात पार पडला. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन व सरस्वती पुजन नटराज विद्यालयाच्या संस्थापिका प्रेमा कुलकर्णी व गेंदीबाई चोपडा विद्यालयाचे प्राचार्य विक्रम काळे, प्रेरणा शिक्षण संस्थेतील वरिष्ठ शिक्षक डॉ. उमेश आगम, एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्‍हाडे, प्राचार्या डॉ.पोर्णिमा कदम, माजी प्राचार्या डॉ. पद्मादेवी विडप, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. पल्लवी चव्हाण, प्रा. मनिषा पाटील, डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रा. गीता कांबळे आदींच्या उपस्थितील झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील प्राविण्य मिळविलेल्यांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्रक देवून गौरविण्यात आले. यावेळी बी.एड.च्या विद्यार्थीनी पारंपारिक वेशभूषा परिधार करून नृत्य, गीत, स्वच्छता पर्यावरण, पर्यावरण संदर्भात समाजप्रबोधन व जनजागृती निर्माण होण्यासाठी नाटीका सादर केली, त्याला उपस्थितांनाही भरघोस प्रतिसाद दिला.

मनोगतात प्राचार्य विक्रम काळे पुढे म्हणाले, तुम्ही भविष्यात शिक्षकी पेशात पदार्पण करणार आहात, शैक्षणिक क्षेत्रात आज बदल घडत आहे. काळाप्रमाणे तुम्ही देखील स्वतःमध्ये बदल घडवून आला. अडचण भासल्यास गुगलवर सर्च करून हवी असलेली माहिती आत्मसात करा, ओढवलेल्या परिस्थितीचा बाऊ करून घेवू नका. आजअनेक विद्यार्थी वाचनात कमी रूची व ऐकण्यात जास्त वेळ घालवतात आदर्श शिक्षक होण्यासाठी जिद्द, चिकाटी, एकाग्रतावर भर द्या, परिस्थितीवर मात करून अनेक विचारवंत घडलेत, त्यांचे चरित्र्य वाचा.

 

यावेळी उद्घाटक प्रेमा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना म्हणाले, आपल्या आत्मसात कलेचा वापर उद्या शिक्षक झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कशाप्रकारे सादरीकरण करू शकता याचे मार्गदर्शन कसे करता येईल, याबाबत अनमोल मार्गदर्शन केले.

प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम यांनी महाविद्यालयाचे वार्षिक अहवाल वाचन केले, तसेच संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांचे विशेष आभार मानले. प्रस्तावना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पल्लवी चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गीता कांबळे व प्रा. मनिषा पाटील यांनी केले. स्वागत व आभार डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी मानले. ‘उडाण’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी बाळू गावडे, अश्विनी सुर्वे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. संतोष उमाटे, प्रा. अस्मिता यादव, प्रा. सुशिल भोंग, प्रा. सुजाता गुप्ता, प्रा. नेहा टाक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!