आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तळेगाव दाभाडे नगरपरिषद अभ्यासिकेच्या २ विद्यार्थ्यांची पोलीस दलामध्ये निवड.

गतवर्षी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत स्पर्धा परिक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका सुरु करण्यात आली असून अल्पावधीतच अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी घसघशीत यश प्राप्त केले आहे.

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषद अभ्यासिकेच्या २ विद्यार्थ्यांची पोलीस दलामध्ये निवड.Selection of 2 students of Talegaon Dabhade Nagar Parishad Study in Police Force.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १८ एप्रिल.

गतवर्षी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत स्पर्धा परिक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका सुरु करण्यात आली असून अल्पावधीतच अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी घसघशीत यश प्राप्त केले आहे. तुषार दळवी (तळेगाव दाभाडे) यांची पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये व दिव्या इंगळे यांची पुणे लोहमार्ग पोलीस दलामध्ये निवड झालेली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, मिळकत व्यवस्थापक जयंत मदने, महिला बालविकास विभाग प्रमुख सुवर्णा काळे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सत्कार करुन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत १० जुलै २०२२ रोजी मोफत अभ्यासिका सुरु करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच २६ जानेवारी २०२३ रोजी डिजीटल लायब्ररी सुरु करण्यात आली असून ५० विद्यार्थी डिजीटल लायब्ररीचा मोफत लाभ घेत आहेत. पोलीस दलामध्ये निवड झालेल्या दिव्या इंगळे यांनी आपल्या मनोगतामध्ये तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत मोफत अभ्यासिका सुरु केल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांची खूप सोय झालेची भावना व्यक्त केली.

त्याचबरोबर अभ्यासिकेमध्ये परिपुर्ण पुस्तके उपलब्ध असून अभ्यास करत असताना अडचणी /शंका असल्यास नगरपरिषदेने उपलब्ध केलेल्या ऑनलाईन लेक्चर्स मधून तात्काळ अडचणी / शंका क्लिअर करण्यास मदत होत आहे. त्यामुळे अल्पावधीत यश संपादन करता आल्याची भावना व्यक्त केली. व तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी / उपमुख्याधिकारी यांनी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

अभ्यासिकेमध्ये राज्यसेवा, राजपत्रित / अराजपत्रित गट ब पुर्व मुख्य परिक्षा, गट क पुर्व मुख्य परिक्षा, पोलीस भरती, तलाठी भरती सरळसेवा यासाठी आवश्यक सर्व पुस्तके मोफत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. अभ्यासिकेमध्ये प्रवेशासाठी समन्वयक अविनाश गायकवाड (मो. ९७६७१३३८३६) यांचेशी संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!