अध्यात्मिकआपला जिल्हासामाजिक

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदीर येथे अक्षय तृतीयेला चंदन उटी सोहळ्या निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

तळेगाव येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदीर . येथे सालाबाद प्रमाणे शनिवार दिनांक २२व २३ एप्रिल रोजी,अक्षय तृतीयेला चंदन उटी सोहळ्या निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे:

Spread the love

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदीर येथे अक्षय तृतीयेला चंदन उटी सोहळ्या निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १९ एप्रिल.

तळेगाव येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदीर . येथे सालाबाद प्रमाणे शनिवार दिनांक २२व २३ एप्रिल रोजी,अक्षय तृतीयेला चंदन उटी सोहळ्या निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे:—सकाळी ७ वा.श्रीची महापुजा व अभिषेक , १० वा.चंदन उटी ,११ वा रूद्रयाग(हवन),
दुपारी ४ ते ५ महिला हरिपाठ,५ते .6.?६भजन,६ वा.दीपमाळ प्रज्वलन व कालभैरवाअष्टकपठण,६.१५ ते ७.१५ हभप यतिराज महाराज लोहोर(भागवताचार्य) ह्यांचे प्रवचन,७.३० वा श्री ची आरती होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.

हिंदुधर्मात अक्षय तृतीयेला विशेष मह्त्व सांगितलं आहे.साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो.अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही क्षय /विनाश न होणारा .
वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील येणार्ऱ्या तृतीयेला “अक्षय तृतीया” असे संबोधले जाते.या तिथीला केलेले जप ,दान व यज्ञ(हवन) हे अक्षय फळ देणारे असते
वैशाख महिना सर्वात जास्त उन्हाचा तडाखा असल्याने,चंदन लेप, चंदन मिश्रित पाण्याचा दैवतांनाअभिषेक करण्याची प्रथा हिंदुसंस्कृतीत आहे.

या तिथीला,अन्न,वस्त्र,जलकुंभ,पंखे,पादत्राणे ,छ्त्री,.गुळ तिळ,जवस,गहू,तांदूळ,मध,तुप,हिरण्य,व दक्षिणा दान केल्याने विशेष पुण्य दायी असते,त्यामुळे ब्रम्हदेव,सगळे देवता व पित्तरही खुष होऊन आशीर्वाद देतात.
ह्या तिथीला देवता व पित्तराचे पूजन केले जात असते.
तसेच देवतांचे व पित्तरांची कृपा मिळवण्यासाठी केलेले कर्म अक्षय(अविनाशी) असते.
वरील सर्व दानधर्म अक्षय होऊन दान देणार्याला सुर्य लोकांची प्राप्ती होते असे म्हंटले जाते.अशी माहिती राजेंद्र सरोदे यांनी आवाज न्यूजला दिली आहे.

 

वरील सर्व कार्यक्रम लोकसह्भागातून व ट्रस्टच्या वतीने आयोजित केला आहे.ग्रामदैवत असल्याने सर्वाना पुण्य मिळाले पाहिजे.
वरील कार्यक्रमांसाठी देणगी द्यायचे आवाहन आयोजकांनी केले आहे  –राजेश पिराजी सरोदे ,यतिन सुरेशभाई शहा,अजय तुकाराम भेगडे,हेमंत शामराव दाभाडे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!