आपला जिल्हाऐतिहासिकमहाराष्ट्रराजकीय

पंधरा दिवसात छञपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्मारकाचे नकाशे तयार करा : आमदार सुनिल शेळके.

छञपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसराचे सुशोभिकरणाचे ठरावास चार वर्षे उलटूनही नगरपरिषद प्रशासन काम करण्यात चालढकल करीत असल्याचे आरोप..

Spread the love

पंधरा दिवसात छञपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्मारकाचे नकाशे तयार करा : आमदार सुनिल शेळके.Prepare maps of Chhapati Shivaji Maharaj Equestrian Statue Memorial in 15 days: MLA Sunil Shelke.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी १९ एप्रिल.

पंधरा दिवसात छञपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्मारकाचे नकाशे तयार करा,तसेच छञपतींचे स्मारकासाठी सर्वपक्षिय समिती स्थापन करा ,अशा सुचना मावळचे आमदार सुनिलआण्णा शेळके यांनी दिल्यानंतर लिंबूसरबत पिवून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व माजी नगरसेवक निखिल कविश्वर यांनी उपोषण सोडले.

छञपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसराचे सुशोभिकरणाचे ठरावास चार वर्षे उलटूनही नगरपरिषद प्रशासन काम करण्यात चालढकल करीत असल्याचे आरोप करून व नगरपरिषदेकडे याबाबत पाठपुरावा करून मिळालेल्या ञोटक माहितीमुळे समाधान न झाल्याने माजी नगरसेवक.कविश्वर यांनी आज सकाळपासून छञपती शिवाजी महाराज चौकात आज लाक्षणिक उपोषण सुरू केले होते.मुख्याधिकारी यांनी आमदारांचे आदेश पाळून पंधरा दिवसांमधे नकाशे बनविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आमदार सुनिल शेळके व सहकार महर्षी माऊली दाभाडे यांचे हस्ते लिंबू सरबत पिवून आजचे उपोषण सोडण्यात आले.

या उपोषण कर्त्यांना सकाळपासून सायंकाळपर्यत शेकडो लोकांनी भेट देवून पाठिंबा दिला.त्यात माजी नगराध्यक्ष व आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे , माजी नगराध्यक्ष राजूशेठ गवळी , माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के , आरपीआय चे शहराध्यक्ष कमलशील म्हस्के , काँग्रेसचे पदाधिकारी उद्योजक संजय गवळी , सामाजिक कार्यकर्ते दत्ताञेय भिमन गवळी , काँग्रेसचे पदाधिकारी फिरोज शेख , डाॕ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे आध्यक्ष चंद्रकांत गायकवाड , माजी आध्यक्ष विजृय जाधव , राष्ट्रवादीचे युवकचे शहर पदाधिकारी सन्नी पाळेकर , संतोष कचरे , माजी नगरसेवक राजू शर्मा , शिवसेना वहातूक सेना जिल्हाध्यक्ष व मेहतर विधानसभा मतदारसंघाचे माजी संपर्कप्रमुख महेश केदारी , पदाधिकारी निरंजन कांबळे , आणि असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

याबाबत  निखिल कविश्वर यांनी पञव्यवहार केला असता , नगरपरिषद प्रशासकीय आधिकारी यांनी दिलेल्या उत्तरात काहीच दम नसल्याने कविश्वर यांनी लाक्षणिक उपोषण केले. लोणावळा नगरपरिषद प्रशासकीय आधिकारी यांना कविश्वर यांनी सांगितले , की आम्ही लोणावळेकर नागरिकांकडून छञपती शिवाजी महाराजांचे स्मारकाचे नवीन डिझाईन तयार केले आहे , ते पाहून घ्या.त्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पहा.नकाशास मंजुरी घ्या आणि लवकरात लवकर स्मारकाचे कामाला प्रारंभ करावा , असे सांगितले .

कविश्वर यांनी ता.६ जानेवारी रोजी नगरपरिषदेकडे पञव्यवहार केला ,ते त्यात म्हणतात, ता.५ जानेवारी रोजी लोणावळा नगरपरिषद यांनी लोकसभा मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते स्मारकाचा भूमिपुजन कार्यक्रम घाईघाईने उरकून घेतला.या स्मारक व उद्यानासाठी अतिशय सुंदर नकाशा तयार करणार होता , व तो डी एस आर रेटनुसार टेँडर बनवून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात येणार होता.पण आचानक घाईघाईने भूमिपूजन उरकून घेतल्याने लोणावळेकर नागरिकांकडून शंकेला वाव मिळाला वा संभ्रम निर्माण झाला आहे.

जे काम ७-८ कोटी खर्चून करणार होते , ते चाळीस लाखात कसे करणार , ? मग चाळीस लाख खर्च पाण्यातच जाणार , असेल तर आणि उद्यानाबाबत दहा कोटी खर्च अपेक्षित असलेले काम करण्यात येणार आहे , त्या ठिकाणी पन्नास लाखाचे पेविंग ब्लाॕकचे काम करण्यात येणार आहे , मग जुने काम रद्द झाले का ? मग नसेल झाले , तर नवीन कामाचा उपयोग होईल का ? ? असे आनेक प्रश्न उपस्थित होत असून लवकरच सर्वपक्षिय मिटींग घेवून याबाबत काय करणार याबाबत माहिती द्यावी , असे पञात म्हटले आहे.
याबाबत नगरपरिषद प्रशासकीय आधिकारी यांनी ता.२/०३ /२०२३ ला पञ दिले आहे.त्यात सात मुद्यांसह उत्तर दिले आहे. त्यात छञपतींचे पुतळ्यांचे सुशोभिकरणाचे काम खासदार बारणे यांचे निधितून करण्यासाठी ३०लक्ष निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने प्रस्तावित केले आहे , ते त्यांचेमार्फत करण्यात येणार आहे.असे मुद्दा क्रमांक ४मधे नमूद केले आहे.
मुद्दा क्र.७ मधे छञपती शिवाजी महाराज उद्यानाचे सुशोभिकरणाचे काम व संकीर्ण काम या कामाचे देखील वरीलप्रमाणे प्रक्रीया करण्यात येणार आहे , असे दोन मुद्दे एकमेकांत घुसडल्याने कविश्वर यांचे समाधान न झाल्याने लाक्षणिक उपोषण केले होते.
यापूर्वीही हिंदू समितीकडून वारंवार पञव्यवहार करण्यात आला आहे,पण नगरपरिषद प्रशासन दाद देत नसल्याचे समोर आले आहे. ..
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!