अध्यात्मिकआपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळाच्या संकल्पनेतून मंदिरा समोरील भव्य सभामंडपाच्या कामास सुरुवात …

Spread the love

श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळाच्या संकल्पनेतून मंदिरा समोरील भव्य सभामंडपाच्या कामास सुरुवात …Shri Vighnahar Ganapati Devasthan Trust President Ganesh Kavade and the Board of Trustees conceptualized the work of the grand assembly hall in front of the temple…

आवाज न्यूज : जुन्नर प्रतिनिधी, २७ एप्रिल.

श्री क्षेत्र ओझर हे अष्टविनायकांपैकी एक अति पवित्र असे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे देवस्थान श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र ओझर येथे जगभरातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी तसेच अष्टविनायक करण्यासाठी येत असतात.भविकांना सेवा पुरविण्याचे काम श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट सातत्याने करत आहे. आज मंगळवार दिनांक २५/०४/२०२३ या शुभदिनी मंदिरासमोरील चौकामध्ये मंदिरास शोभेल अशा भव्य सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन सकाळी ११.०० वाजता केल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली.

.या शुभकार्यांचा प्रारंभ श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे माजी अध्यक्ष मुरलीधर घेगडे,माजी अध्यक्ष शाकुजी कवडे,माजी उपाध्यक्ष रघुनाथ मांडे,माजी खजिनदार जगन्नाथ कवडे ,मंगलमूर्ती पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडे , मा.उपाध्यक्ष सुर्यकांत रवळे , सौ.शिलाताई मांडे, देवस्थानचे माजी विश्वस्त गणपत टेंभेकर , ग्रामविकास अध्यक्ष संतोष मांडे,महेश कवडे तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय कवडे या अकरा यजमानाच्या शुभहस्ते नारळ वाढवून केला. या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे सचिव दशरथ मांडे,खजिनदार कैलास घेगडे,विश्वस्त रंगनाथ रवळे,आनंदराव मांडे,किशोर कवडे,मंगेश मांडे,विजय घेगडे,ओझर गावचे चरामपंचायत सदस्य रवि मांडे ,सौ सुमन मांडे,माजी विश्वस्त बबन कवडे, ग्रामस्थ लक्ष्मण टेंभेकर , अविनाश मांङे, विकास कवडे , संतोष कवडे , प्रकाश टेंभेकर, दत्तात्रय माङे , दत्तात्रय रवळे , तान्हाजी मांडे , विनायक रोकडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थउपस्थित होते.

होणाऱ्या भव्य दिव्य अशा सभामंडपामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण पहावयास मिळाल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त मंगेश मांडे यांनी दिली . सर्व ग्रामस्थांचे आभार खजिनदार कैलास घेगडे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!