ताज्या घडामोडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर व श्रद्धा रक्तपेढी आयोजित रक्तदान शिबीरात आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे रक्तदान…सुमारे ६९ बाटल्या रक्तदात्यांनी केले रक्तदान.

Spread the love

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर व श्रद्धा रक्तपेढी आयोजित रक्तदान शिबीरात आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे रक्तदान :सुमारे ६९ बाटल्या रक्तदात्यांनी केले रक्तदान.

आवाज न्यूज लोणावळा प्रतिनिधी १मे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर व श्रद्धा रक्तपेढी आयोजित रक्तदान शिबीरात आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचेसह सुमारे ६९ रक्तदात्यांनी रक्तदान करून देशसेवेला हातभार लावला. हिंदुसमितीतर्फे अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते , तरूणवर्ग यांनी या शिबीरात सहभाग घेतला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि श्रध्दा रक्तपेढी डोनेट ए लाईफ यांचेवतीने महाराष्ट्र दिन व कामगारदिनानिमित्त आयोजित केलेल्या या शिबीरात सुमारे ६९ बाटल्या रक्तदान करण्यात आले.लोणावळा नगरपरिषद इमारतीत पार्कींगमधे१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित केलेल्या याभव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन लोणावळा नगरपरिषदचे मुख्याधिकारी.पंडित पाटील साहेब व लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक.सिताराम डुबल साहेब,मनसे अध्यक्ष.भारत रमेश चिकणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी सत्यसाई कार्तिक साहेब (IPS) यांनी स्वतः शिबिरास भेट दिली व साहेबांनी रक्तदान केले. त्याच बरोबर हिंदू समिती सदस्य सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिबिरास तब्बल ६९ रक्तदात्यांनी सहभाग नोँदवला.त्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपञके मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी विशाल पाडाळे (मा. नगरसेवक), सुरेश जाधव, कुरवंडे चे उपसरपंच विशाल कडू (उपसरपंच कुरवडे),ओम शिवदत्त प्रासादिक दिंडीचे चालक ह भ प गोकुळभाऊ भुजबळ (पिपरी), काँग्रेसचे पुणे शहर चिटणीस मंगेश निरगुडकर , भाजपचे संजयजी शिंदे , बाळकृष्ण चिकणे (सामाजिक कार्यकर्ते), वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य हर्षल होगले, लोणावळा शहर प्रवक्ते अमित भोसले, मनसे वहातूक सेना शहराध्यक्ष निखिल भोसले, निखिल सोमण, प्रसिद्धी प्रमुख उमेश बोडके, उपाध्यक्ष सुनिल भोंडवे, शहर उपाध्यक्ष दिनेश कालेकर, उपाध्यक्ष मधुर पाटणकर, रोहिदास शिंदे,लोणावळा नगरपालिका कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

शिवदुर्ग मिञचे व हिःदु समितीचे पदाधिकारी सुनिल गायकवाड , चंद्रकांत गाडे , दिपक कांबळे , महेश मसने , शैलेश भोसले , नगरपरिषद सेवक वर्ग पतसंस्थेचे संचालक जितेंद्र राऊत , उल्हास पाळेकर ,लोणावळा शहर संघटक आभिजित फासगे ., प्रशांत वैद्य आदी उपस्थित होते.
हिंजवडीतील जनसेवा रक्तपेढी च्या डाॕ.श्रूतिका आग्रे , तसेच त्यांचे सहकारी कर्मचारी तनुजा घारे , रोषणा जोरी , स्मिता शिंदे , निलेश राठोड आजम जहागीरदार , करीम मुल्ला , लक्ष्मण बिरादार आदींनी उपस्थित राहून रक्त संकलन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!