आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी , कुसगाव बुद्रूक येथे मंगळवारी ता.२ पासून बेमुदत उपोषण..

सहा वर्षापासून वेतन थकल्याने आंदोलनाचा पविञा..

Spread the love

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी , कुसगाव बुद्रूक येथे मंगळवारी ता.२ पासून बेमुदत उपोषण ; सहा वर्षापासून वेतन थकल्याने आंदोलनाचा पविञा..Indefinite hunger strike at Sinhagad Technical Education Society, Kusgaon Budruk on Tuesday from 2 am; Due to non-payment of wages for six years, the protest was called off.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी २ मे.

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी , कुसगाव बुद्रूक येथे मंगळवारी ता.२ पासून बेमुदत उपोषण ; सहा वर्षापासून वेतन थकल्याने सुमारे ८१ चेवर महिला व पुरूष सफाई कामगारांनी आंदोलनाचा पविञा घेतला आहे.
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी या कँपस मधे सुमारे अनेक विद्याशाखा मधे हजारो विद्यार्थी व विद्यार्थीनी गेली वीस बावीस वर्षापासून शिक्षण घेत आहेत. शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी येथे नोकरी करत आहेत.

डोनेशन , फी , यारूपाने कोट्यावधी रूपयांची उलाढाल येथे होत असुन, तेथे सुमारे पंचवीस ते तीस लहान मोठी दुकाने, लहान मोठ्या हाॕटेलचा व्यवसाय चालतो.पन्नास साठ रिक्षा यांची रोज ये जा असते.अशा या एज्युकेशन सोसायटी ची रस्ते , परिसर , आणि शाळा , महाविद्यालयाचे तसेच होस्टेलचे रूमची रोजची साफसफाई या सुमारे शंभरचेवर सफाई कर्मचारी , शिपाई यांचेकडून केली जात आहे.

कोरोनाच्या कठीण काळातही येथील सर्व सफाई कर्मचारी यांनी वेतनात काटछाट होऊनही कुरकूर न करता कसाबसा संसाराचा गाडा हाकला , पण आता कोरोनाचा काळ संपला. सिंहगड चे व्यवस्थापकांनी पूर्ण वेतन व मागील थकीत वेतनही द्यावे , आणि संसाराला हातभार लावावा , आशीच मागणी गेली सहा महिने कामगार करीत आहे.प्रशासनाने न ऐकल्याने ता.२ पासून सर्व महिला व पुरूष कामगार बेमुदत , आमरण उपोषणाला बसणार असल्याचे ,उद्योजक व माजी ग्रामपंचायत सदस्य संतोषभाऊ राऊत यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!