आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजन

LFW या संस्थे अंतर्गत मुंबई येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व आंतर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कान्हे केंद्रातील जांभूळ शाळेचे अभूतपूर्व यश..

Spread the love

LFW या संस्थे अंतर्गत मुंबई येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व आंतर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कान्हे केंद्रातील जांभूळ शाळेचे अभूतपूर्व यश.Unprecedented success of Jambhul School at Kanhe Kendra in the state level and inter state level competition held in Mumbai under the organization LFW.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी ३ मे.

LFW या संस्थेअंतर्गत 2022-23मध्ये WPC (word Power Championship)ही राज्यस्तरीय व आंतरराज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गातून राज्यभरातून विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये सर्वात प्रथम एलिमिनेशन राऊंड, त्यानंतर कॉर्टर फायनल, सेमी फायनल हे राउंड ऑनलाइन घेतले व नंतर फायनल राऊंड हा मुंबई येथे दिनांक 26/4/2023रोजी घेण्यात आला.

या स्पर्धेमध्ये जांभूळ येथील
1)सार्थक सुरेश ओव्हाळ( प्रथम क्रमांक) इयत्ता5 वी
2) वैष्णवी तुकाराम खिल्लारे (द्वितीय क्रमांक)इयत्ता5 वी मार्गदर्शक शिक्षक. कविता गोरक्षनाथ जोशी तसेच इयत्ता तिसरी मधून रुद्र विनोद सावळे तृतीय क्रमांक मार्गदर्शक शिक्षक श्रीमती रेखा पांडुरंग दाभोळकर,

त्यानंतर दिनांक 28/4/2023 रोजी आंतर राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेत एकूण सात राज्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये महाराष्ट्र,बिहार, राजस्थान, छत्तीसगड, तामिळनाडू, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांचा सहभाग होता. यामध्ये पुन्हा एकदा बाजी मारत जांभूळ येथील इयत्ता पाचवीतील सार्थक सुरेश ओव्हाळ. द्वितीय क्रमांक.

आलेला आहे यासाठी विद्यार्थ्यांना टॅब, सायकल, ट्रॅक सुट, बुट, सन्मानचिन्ह, प्रशिस्तपत्रक यांसारखी भरघोस बक्षिसे देण्यात आलेली आहेत. यावेळी बक्षिस वितरणासाठी संस्थेचे संचालक आदरणीय प्रणील नाईक सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कान्हे केंद्राचे केंद्रप्रमुख . अजित नवले सर तसेच मुख्याध्यापक.संगीता जगताप मॅडम,सर्व शिक्षक वृंद यांनी समाधान व्यक्त केले आहे . तसेच जांभूळ गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सर्व सदस्य यांनी विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल कौतुक व समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे जांभूळ गावामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!