आपला जिल्हासामाजिक

मळवलीत धर्मवीर छञपती संभाजीराजे सामुदायिक विवाह सोहळ्यात सहा जोडपी विवाहबध्द .

फक्त १०१ रु वधुवरांकडुन घेऊन शाही थाटात विवाह संपन्न झाला!

Spread the love

मळवलीत धर्मवीर छञपती संभाजीराजे सामुदायिक विवाह सोहळ्यात सहा जोडपी विवाहबध्द .Six couples got married at Dharmaveer Chhapati Sambhajiraje community wedding ceremony in Malwali.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी १४ मे.

मळवलीत धर्मवीर छञपती संभाजीराजे सामुदायिक विवाह सोहळ्यात सहा जोडपी विवाहबध्द झाली. या विवाह सोहळ्यानिमित्त राज्याचे मंञी तानाजी सावंत उपस्थित राहून त्यांनी वधू , वरांना शुभाशिर्वाद दिले.

यावर्षी स्थापन झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे प्रथम वर्ष आसूनही तालुक्यात एक आगळा वेगळा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.फक्त १०१ रु वधुवरांकडुन घेऊन शाही थाटात विवाहसंपन्न झाला.

वाजंत्री,ढोललेझीम,बैलगाडीतुन वरांची मिरवणुक अशा पारंपरिक पध्दतीने पार पडला हा दिमाखदार सोहळा!हजारो वह्राडी मंडळी, पंचक्रोशीतील ग्रांमस्थ, तालुक्यातील सर्व पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, वारकरी सांप्रदायातील, शेतकरी, कामगार त्याच महीलां भगिनीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती ,महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय तान्हाजी सावंत साहेबांच्या उपस्थितीत एक आगळा वेगळा शाही थाटात हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.

प्रत्येकजोडप्यास संसारउपोयगी वस्तु बरोबर वडाचा झाड देऊन वृक्ष लागवड व त्याचे संगोपन याचाही संदेश दिला!सोहळा कमिटीच्या कार्येकर्त्यांनी घरातीलच विवाह सोहळा समजुन प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळलीशेवटी जड अंतकरणाने नववधुंची पाठवणी करत प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या . आपल्या सामाजिक भावनेचं कर्तव्य निर्विघ्नपणे पार पडलं याचं समाधान मात्र प्रत्येकाचे चेहर्‍यावर दिसत होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!