आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

डॉ.संदीप गाडेकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर निवड..

Spread the love

डॉ.संदीप गाडेकर यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर निवड

आवाज न्यूज : वडगाव मावळ प्रतिनिधी १५ मे.

येथील श्री.संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालयातील डॉ. संदीप गाडेकर यांची प्रशासन व मूल्यमापन विषयाच्या अभ्यास मंडळावर नुकतीच नेमणूक झाली आहे.

आतापर्यंत डॉ. संदीप गाडेकर यांनी 20 शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रसिद्ध केले असून एकूण 4 विद्यार्थ्यांना पीएच.डी चे मार्गदर्शन सुरू आहे. तसेच 40 राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पर शोध निबंध सादर केलेले आहे. व आत्तापर्यंत एकूण 12 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

त्याच्या निवडीबद्दल संस्थेचे सचिव .अशोक बाफना , अध्यक्ष.तुकाराम असवले व सर्व संचालक मंडळ व प्रभारी प्राचार्य डॉ.अनिता धायगुडे यांनी अभिनंदन केले. व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या दरम्यान ही निवड झाल्याने त्यांना अधिक भरीव कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!