आपला जिल्हामहाराष्ट्र

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांची पंढरपूर नगरपरिषदेत बदली..

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांची पंढरपूर नगरपरिषदेत बदली..Talegaon Dabhade Municipal Council Deputy Chief Supriya Shinde transferred to Pandharpur Municipal Council.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर २१ मे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या  उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांची पंढरपूर नगरपरिषद येथे बदली झाली.तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची पोटनिवडणूक,नगरपरिषदेतील विविध विभागांची जबाबदारी,कोरोना काळात शासनाच्या विविध विभागांशी साधलेला समन्वय, विद्यार्थ्यांसाठी ई लायब्ररी उभारण्यासाठीचे योगदान, एवढ्या व्यापातून वेळ काढून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अशा विविध लोकोपयोगी उपक्रमांमुळे तळेगावकरांच्या साडेचार वर्ष सुप्रिया शिंदे चर्चेत राहिल्या.

त्यांना नियुक्तीचे पत्र आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिले असून तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश बजावले आहेत.

उपमुख्याधिकारी सुप्रिया तानाजी शिंदे या मुंबई येथे २०१८ साली घेतलेल्या स्पर्धा परीक्षा मध्ये उत्तीर्ण होउन १८ जानेवारी २०१९ रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये रुजू झाल्या.त्यांचेवर नगर परिषदेत उपमुख्याधिकारी,सोबतच जन्म मृत्यू विभाग,कर विभागाचे नियंत्रण याची जबाबदारी होती.त्यांनी त्यांच्या कार्यकाळात तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या पोटनिवडणूकीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. कोरोनाच्या काळात पूर्णवेळ मुख्याधिकारी उपलब्ध नसतानाही प्राथमिक आरोग्य केंद्र, तहसील कार्यालय-मावळ,उपविभागीय अधिकारी मावळ – मुळशी यांचेशी योग्य समन्वय साधत तळेगाव मधील कोरोना संसर्गाचा प्रसार आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला.

तसेच स्पर्धा परीक्षाची तयारी करताना केलेल्या आपल्या अभ्यासाचा फायदा नगरपरिषद विद्यार्थ्यांना व्हावा, याकरिता तळेगाव मध्ये अत्याधुनिक इ लायब्ररी उभारणेसाठी महत्वाचे योगदान दिले.तसेच कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त असलेल्या वेळेत स्काॅलरशिपच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व गणित, बुद्धिमत्तेचे धडे शिकवले.

माझी वसुंधरा अभियानची अंमलबजावणी करताना नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जागृती व्हावी यासाठी विविध रॅली, पथनाट्य कार्यक्रम, वृक्ष लागवड असे विविध उपक्रम राबविले.गेल्या साडेचार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नगरपरिषदेच्या सर्व विभाग समन्वय साधून प्रशासन सुरळीत चालेल याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!