आपला जिल्हानिधनवार्ता

कुसगाववाडी येथिल सामाजिक कार्यकर्ते सहादू ठोंबरे यांचे निधन..

कै.सहादू तुकाराम ठोंबरे यांचे तेरावा विधी निमित्त कुसगाववाडी , ता -मावळ येथे राहतेघरी ता.४ जून रोजी होईल.

Spread the love

कुसगाववाडी येथिल सामाजिक कार्यकर्ते सहादू ठोंबरे यांचे निधन..Kusgaonwadi social worker Sahadu Thombare passed away.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, २८ मे. 

कुसगाववाडी येथिल सामाजिक कार्यकर्ते सहादू तुकाराम ठोंबरे (वय-६५) यांचे नुकतेच अल्पशः आजाराने ता.२३ मे २०२३ रोजी निधन झाले. त्यांचे पार्थिवावर भैरवनाथनगर , कुसगाव बुद्रूक येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डोँगरगाव चे सरपंच सुनिल येवले आणि आय आरबी कंपनी युनिटचे प्रतिनिधी श्री.जाधव यांनी श्रध्दांजलीपर भाषणे केली.

त्यांचे पश्चात आई , पत्नी , एक भाऊ , तीन विवाहीत मुलगे , एक विवाहीत मुलगी , सुना , नातवंडे , जावई , पुतने , असा परिवार आहे.
शिवसेना मावळ तालुका प्रमुख गबळूभाऊ ठोँबरे हे त्यांचे चुलतबंधू होत.
आयआरबी कंपनी , कुसगाव युनिट येथील कामगार प्रतिनिधी रोहिदास सहादू ठोंबरे , युवक कार्यकर्ते गणेश सहादू ठोंबरे व दिनेश सहादू ठोंबरे  हे त्यांचे सुपुञ होत. तसेच सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग तुकाराम ठोंबरे हे त्यांचे धाकटे बंधू होत. कै.ठोंबरे यांनी सुमारे चाळीस वर्षे लोणावळ्यातील विविध चिक्की कारखाण्यात आचारी म्हणून काम केले व सेवानिवृत्त झाले. कष्ठातून संसार फुलवला. त्यांचे निधनामुळे ठोंबरे परिवार व ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.
कै.सहादू तुकाराम ठोंबरे यांचे तेरावा विधी निमित्त कुसगाववाडी , ता -मावळ येथे राहतेघरी ता.४ जून रोजी सकाळी ९ ते १० ह.भ.प.तुषारमहाराज दळवी (भाजे ) यांचे प्रवचन होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!