आपला जिल्हाक्राईम न्युजमहाराष्ट्र

तळेगावात पोलिसांनी काढली किटक गॅंगची धिंड..

Spread the love

तळेगावात पोलिसांनी काढली किटक गॅंगची भरदिवसा धिंड…In Talegaon, the police busted the Kitak gang in broad daylight…

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, २९ मे.

भरवस्तीत गोंधळ घालत दहशत निर्माण करणाऱ्या किटक गॅंगला व म्होरक्याला पोलिसांनी अटक केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने किटक गॅंग गुन्हेगारांची तळेगाव दाभाडे येथे रस्त्यावर धिंड काढली.

किटक उर्फ जय प्रवीण भालेराव (वय १९ ), वैभव राजाराम विटे (वय २५, दोघेही रा. तळेगाव दाभाडे), विशाल शिवाजी गुंजाळ (वय २०, रा. वराळे), प्रदीप वाघमारे (वय २०, रा. वडगाव), रुतिक मेटकरी (वय २०, रा. देहूरोड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह एका विधीसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. एका महिलेने याप्रकरणी बुधवारी (दि. २४) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किटक याने साथीदारांसह तळेगाव दाभाडे येथे भर दिवसा मुलींची नावे घेऊन गल्लीमध्ये आरडाओरडा केला. फिर्यादी महिलेला मारहाण करून विनयभंग केला. महिलेच्या दीराला कोयत्याचा धाक दाखवून खिशातील दीड हजार रुपये काढून घेतले. लोकांना धमकावून दहशत निर्माण केली.

 

गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरिश माने आणि त्यांच्या पथकाने आरोपींचा माग काढून अटक केली. गुन्ह्याच्या तपासकामी आरोपींना घटनास्थळी नेले. आरोपींची धिंड काढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

किटक टोळीचा प्रमुख असलेला किटक भालेराव याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दरोडा, विनयभंग, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारहाण करून धमकी देणे व दहशत निर्माण करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

आरोपी वैभव विटे याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सात तर चाकण पोलीस ठाण्यात एक असे आठ विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी विशाल गुंजाळ, प्रदीप वाघमारे आणि रुतिक मेटकरी यांच्यासह विधीसंघर्षित बालकाच्या विरोधात देखील विविध गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!