आपला जिल्हाकृषीवार्तामहाराष्ट्रसामाजिक

अधिकाऱ्यांना मावळात निर्यातीचे प्रशिक्षण..

शेतमाल निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात अग्रेसर राज्य म्हणून प्रसिद्ध आहे.

Spread the love

अधिकाऱ्यांना मावळात निर्यातीचे प्रशिक्षण.शेतमाल निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात अग्रेसर राज्य म्हणून प्रसिद्ध आहे.Mawlat export training to officers. Maharashtra state is known as the leading state in the country in agricultural exports.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ३१ मे.

येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत तमिळनाडू राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना निर्यातीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे.शेतमाल निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात अग्रेसर राज्य म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या तळेगाव येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून तमिळनाडू राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यासाठी फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुभाष घुले, पुणे यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी डॉ. गोविंद हांडे कृषी निर्यात सल्लागार, , संजय पारडे व्यवस्थापक, विश्वास जाधव,रमेश घुले व संपत यादव उपस्थित होते.

याचे प्रशिक्षण २९ मे ते १ जून या कालावधीत संपन्न होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने फलोत्पादन पिकांच्या निर्यातीसंदर्भात प्रक्रिया, निर्यातीसाठी विविध परवाने, मुंबई, वाशी येथे प्रत्यक्ष भेट देऊन निर्यात प्रक्रिया समजाऊन घेणे व भारत सरकारचे अपेडा कार्यालयात भेट देणे आदी बाबींचा समावेश असणार आहे. याप्रसंगी बोलताना डॉ. सुभाष घुले यांनी सुधीर तुंगार सचिव तथा कार्यकारी संचालक, दीपक शिंदे सरव्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली इतर राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांच्यासाठी पारंपरिक प्रशिक्षणापेक्षा मूल्यवर्धित शेतमाल प्रक्रिया, भौगोलिक मानांकन, शेतमालाचे पेटंट, ब्रँडींग, पॅकेजिंग असे विविध प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करणे अत्यंत गरजेचे असल्याचे नमूद केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!