अध्यात्मिकआपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

प्रतिभा महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज चा दिंडीत खाऊ वाटप व वारी मध्ये सहभाग..

Spread the love

प्रतिभा महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज चा दिंडीत खाऊ वाटप व वारी मध्ये सहभाग..Participation of Pratibha College and Junior College in Dindi food distribution and wari..

आवाज न्यूज ;  चिंचवड प्रतिनिधी १४ जुन.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा महाविद्याल व ज्यूनिअर कॉलेज मधील विद्यार्थी , प्राध्यापकांनी आषाढी वारी निमित्त निघणाऱ्या संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्या सोबत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कॉलेजच्या विद्यार्थी व प्राध्यापकानी सहभाग घेऊन वारकऱ्यांना खाऊ वाटप केला. आकुर्डी ते चिंचवड स्टेशन , पिंपरी पर्यत दिंडी सोबत पायी चालण्याचा आनंद घेतला.पहाटे पाच वाजल्यापासून ते साडे सात पर्यंत विद्यार्थी व प्राध्यापक या दिंडी मध्ये सहभाग घेतला होता.विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या संस्कृतीची जपणूक करण्यासाठी अशा उपक्रमाचे आयोजन महाविद्यालय करत असते.

कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉं क्षितिजा गांधी ,उपप्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्टुडंट्स वेलफेअर व सोशल ऍक्टिव्हिटी कमिटी अंतर्गत प्रा.अर्चना गांगड , राष्ट्रीय सेवा योजनाच्या प्रमुख प्रा आश्लेषा देवळे , प्रा कुंभार , यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम व्यवस्थित पार पडला.संस्थेचे सचिव डॉ दीपकजी शहा यांनी प्रोत्साहन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!