आरोग्य व शिक्षण

कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

Spread the love

तळेगाव दाभाडे : येथे शुक्रवार( दि.18 फेब्रुवारी) रोजी तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये प्रि-प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

यावेळी यशस्वी उद्योजक व व्यावसायिक विद्यमान नगरसेवक  निखिल भगत,शाळेचे संस्थापक अध्यक्ष  चंद्रकांत काकडे, शाळेचे अध्यक्ष श्री. संदिप काकडे संस्थेचे खजिनदार ताणकर सर शाळेच्या खजिनदार गौरी काकडे व शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर उपस्थित होत्या.सर्वानी मुलांच्या उत्स्फुर्त नृत्याचे कौतुक केले.या वेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!