आपला जिल्हासामाजिक

निगडीतील कै. मधुकरराव पवळे पुलाजवळ गॅसचा टँकर पलटी.

Spread the love

निगडीतील कै. मधुकरराव पवळे पुलाजवळ  गॅसचा टँकर पलटी.Kai from Nigdi. Hpg gas tanker overturned near Madhukarrao Pavle bridge.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, २५ जुन.

निगडीतील कै. मधुकरराव पवळे पुलाजवळ BPCL कंपनीच्या गॅसच्या टँकरला आज पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात टँकर रस्त्यातच पलटी झाल्यामुळे यामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज (दि.२५) जून रोजी पहाटे 3.30 वाजता गॅस वाहतुक करणारा HPG कंपनीचा टँकर मुंबईकडून पुण्याच्या दिशेने निघाला होता. निगडीतील कै.मधुकरराव पवळे पुलाच्या सुरवातीला हा टँकर अपघातग्रस्त होऊन पलटी झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून भक्ती शक्ती उड्डाण पुल आणि कै. मधुकर पवळे उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले.

सदरची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ४ टीम तसेच मुख्य अग्निशमन अधिकारी विजय थोरात, अग्निशमन अधिकारी चिपाडे तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, उपायुक्त रविकिरण घोडके, माजी नगरसेवक सचिन चिखले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे व इतर ५० पोलीस पोहोचले होते. त्यानंतर गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वाहने आलेली असून रस्ता मोकळा करण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!