आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रसामाजिक

लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो..

मुंबई - पुण्यातुन येणारे पर्यटक, लुटणार वर्षाविहारचा आनंद.

Spread the love

⋅लोणावळ्यातील भुशी धरण ओवरफ्लो, मुंबई पुण्यातुन येणारे पर्यटक, लुटणार वर्षाविहारचा आनंद.Bhushi dam overflow in Lonavala, tourists coming from Mumbai Pune, will spoil the joy of summer vacation.

आवाज न्यूज : लोणावळा, प्रतिनिधी, १ जुलै.

पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे.१ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास भुशी धरण ओव्हरफ्लो झाले त्यामुळे येथील व्यवसायिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

लोणावळा खंडाळा ही शहरे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. व येथील भुशी धरण हे पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण आहे. धरणाच्या सांडव्यावरुन पायऱ्यांवर वाहणाऱ्या पाण्यात बसून वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक लोणावळ्यात येत असतात.हे भुशी धरण दरवर्षी ओव्हरफ्लो झाले की खऱ्या अर्थाने पावसाळी पर्यटनाला सुरुवात होते. अनेक मुंबई पुण्यातुन पर्यटक धरणाच्या पायऱ्यांवर बसण्याचा व या परिसरातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.

  1. तसेच पावसाळी सिझनच्या चार महिने व्यवसायावर येथील नागरिकांचे वार्षीक अर्थचक्र अवलंबून असते. शनिवारी सकाळीच धरण भरल्याची गोड बातमी समजल्याने शनिवार व रविवार दोन्ही दिवस धरणावर पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!