आपला जिल्हाक्राईम न्युजमहाराष्ट्रसामाजिक

लोणावळा पोलिसांकडून काळ्या काचा लावणाऱ्या वाहणांवर कारवाई करावी..

गुन्हेगारी मोडून काढावी .!

Spread the love

लोणावळा पोलिसांकडून काळ्या काचा लावणाऱ्या वाहणांवर कारवाई करावी ; गुन्हेगारी मोडून काढावी .!Lonavala police should take action against black glass vehicles; Crime should be broken!

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, ८ जुलै.

पोलिसांकडून काळी काच लावणाऱ्या वाहणांवर कारवाई करावी .तसेच ग्रामिण भागातील हाॕटेलमधे ही सीसीटीव्ही लावल्यामुळे गुन्हेगारी मोडून काढण्यास मदत होईल.
पवनाधरणाकडे जाणारे शेकडो पर्यटक , रिक्षाने , मोटारसायकलवर किंवा खाजगी कारने , बसने जातात..काही पर्यटक कारला काळ्या काचा लावून फिरतात. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळताना दिसते.

औंढोली येथील एका खाजगी हाॕटेल जृवळ आज एक कार आर्धातास थांबली..कुणीही खाली उतरले नाही , की काही खरेदी केली नाही. कार परत रिवर्स झाली.कारला काळ्या काचा असल्याने काही दिसले नाही.थोड्या वेळाने दोन पोलिसांच्या कार गावात शिरल्या..

काही पर्यटक व काही गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले लोक काही गुन्ह्याच्या कामासाठी कारला काळ्या काचा लावून फिरतात , त्यामुळे पोलिसांनाही गुंगारा देवून ते निसटून जातात , त्यामुळे पुणे ग्रामिणचे पोलिसअधिक्षक यांनी काळ्या काचा लावलेल्या गुन्हेगारी वा सर्वसामान्य वाहनचालकांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!