आपला जिल्हाऐतिहासिकमहाराष्ट्र

सुरेशजी चव्हाणके यांची लोणावळा वैक्स म्युझियम व शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास सदिच्छा भेट…

प्रतिकूल परिस्थितीत देखील उभे राहिलेले हे संग्रहालय समाजाकडून दुर्लक्षित होता कामा नये. सुरेशजी चव्हाणके. सुदर्शन न्यूज चॅनलचे संस्थापक अध्यक्ष.

Spread the love

सुरेशजी चव्हाणके यांची लोणावळा वैक्स म्युझियम व शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास सदिच्छा भेट…Sureshji Chavanke’s goodwill visit to Lonavala Wax Museum and Shivshahi Museum of Historical Artifacts…

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, ८ जुलै.

सुदर्शन न्यूज चॅनलचे संस्थापक अध्यक्ष. सुरेशजी चव्हाणके यांनी लोणावळा वैक्स म्युझियम आणी शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास नुकतीच भेट दिली. सदर दौरा नियोजित होता.

भेटी दरम्यान ते म्हणाले, “दोन्ही संग्रहालये मागील काही वर्षे पर्यटन विकासात मोलाचे योगदान देत आहेत. समाजाची पर्यटनाची भूक भागवणाऱ्या अशा संग्रहालयांचा झालेला विकास हा लोणावळा शहर आणी मावळ तालुक्याचे भूषण ठरले आहे. मी महाराष्ट्रातील सर्व जनतेला अवाहन करेल की, त्यांनी या पर्यटन नगरीला आणी विशेष गुणवत्तेने उभारल्या गेलेल्या या संग्रहालयांना निश्चितच भेट द्यावी. राजेंद्र चौहान,  धवल चौहान व डॉ. प्रमोद बोराडे यांच्या मेहेनतीने लोणावळा शहरातील या पर्यटन स्थळाला अधिकांश लोकांनी भेट दिलीतर आपला इतिहास, संस्कृती आणी परंपरा नव्या पिढीला कळतील.

दुर्मिळ वस्तू व शस्रास्र सहज कुठे पहायला मिळत नाही. मात्र येथे शस्राला प्रत्यक्ष हात लावून अभ्यास करण्याची तथा अनुभूती घेण्याची व्यवस्था आहे ही विशेष बाब आहे. मागील २५ वर्षात महाराष्ट्रात ऐतिहासिक वस्तू संग्रहालये उभी राहिली नाहीत. प्रतिकूल परिस्थितीत देखील उभे राहिलेले हे संग्रहालय समाजाकडून दुर्लक्षित होता कामा नये. माझ्या शुभेच्छा दोन्ही संग्रहालयाला आहे. आगामी काळात सुदर्शन न्यूज चैनल वर हा संपूर्ण विभाग आणी ८- ९ पर्यटनाच्या गेमस/ ऍक्टिव्हिटी दाखविणार आहे.

सोमनाथ बोराडे व धवलं चौहान यांनी त्यांचा सन्मान केला. सचिन ढमाले व डॉ. प्रिया बोराडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!