आरोग्य व शिक्षण

समाजाची चालती-बोलती संस्कारपीठ”!– कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात– या बसा– रडणं तर नेहमीचंच

अत्रे सर आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की-- प्रत्येकाला योग्य क्रमांक देणं हे किती अवघड होतं हे मला खरोखरचव्यक्त करता येत नाही .

Spread the love

ज्येष्ठनागरिक– समाजाची चालती-बोलती संस्कारपीठ”!– कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात– या बसा– रडणं तर नेहमीचंच असतं– थोडं तरी हसा! अंधाराचा आसरा -थोडा वेळ विसरा! काळजामध्ये जपा उजेडाचा वसा!! मित्रांनो- आज हे सर्व आठवायचं कारण म्हणजे– शुक्रवार दिनांक 13 मे 2022 या प्रसन्न दिनी आम्ही ज्येष्ठांना थोडं थोडं बोलतं केलं! वृद्धत्वाच ओझं वाटू नये म्हणून या वयात प्रत्येकाला केवळ प्रेमळ संवादाची तृष्णा असते आणि ही त्यांची तृष्णा भागली की त्यांच आयुष्य समाजासाठी संस्कृतीची विद्यापीठ ठरतात हा आपला अनुभव आहे! मित्रांनो या उपक्रमाची रूपरेषा आणि संकल्पना अशी होती की– आमच्या जेष्ठ नागरिक मित्र मंडळातील वक्ता म्हणून नाव नोंदवलेल्या फक्त सहा सभासदांना प्रत्येकी दहा मिनिटं त्यांच्याच आयुष्यातील अनुभव कथन करण्याची संधी आम्ही दिली होती! प्रत्येकाचे अनुभव ऐकताना आम्हाला क्षणोक्षणी आश्चर्याचे सुखद धक्केच बसत होते! आपले मनोगत व्यक्त करणारे ओपनिंग बॅट्समन म्हणून दिगंबर कुलकर्णी यांनी संधी घेतली होती! गुजरातेतील भूकंप तसेच पुण्यातील जर्मन बेकरीला लागलेली आग- त्यासाठी दिगंबर कुलकर्णीनी दिलेले योगदान हे त्यांनी कथन करताना त्यांच्यासमोर घडलेला तो प्रसंग त्यांनी अगदी बोलक्या शब्दात प्रत्यक्ष उभा केला!  मुंगिकर- या एक साध्या गृहिणी पण– प्रापंचिक संघर्षामुळे आर्थिक संकटांशी त्यांनी कसा लढा दिला हे त्यांच्या सोसलेल्या अंतकरणातून उमटणाऱ्या प्रत्येक शब्दा शब्दात जाणवत होते! स्त्री शक्तीची प्रचीती– प्रत्यक्ष अनुभवलेल्या प्राची साठे यांनी- त्यांच्या आयुष्यात घडलेल्या नाट्यपूर्ण प्रसंगातून व्यक्त केली! तळेगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा मीराताई फल्ले यांनी त्यांचा गृहिणी ते नगराध्यक्षपद हा संघर्षमय प्रवास आपल्या अनुभव संपन्न शब्दातून प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष साकार केला! सौ स्मिता गोंधळेकरांनी- उच्चविद्याविभूषित असलेले आपले जन्मदाते पिता- अत्यंत संवेदनशील असलेली आपली जन्मदात्री माता आणि विविध क्षेत्रातील आप्तस्वकीय मित्रपरिवार- यांच्यातच आनंद शोधत शोधत त्या स्वतः आनंदयात्री कशा बनल्यात हे अत्यंत संवेदनशील शब्दात सादर केले! मित्रांनो– आनंद ही एक मानसिक स्थिती आहे– विशिष्ट गतीतून ही स्थिती प्राप्त होऊ शकते हा संदेश सौ स्मिता मॅडमने अतिशय मधाळ शब्दात व्यक्त केला! शेवटचे मनोगत– संरक्षणखात्यातील निवृत्तअधिकारी – व्हालीबॉल–हॉकी क्षेत्रात नाव कमावलेले व राष्ट्रीय पातळीवरील हास्य कवि शरदजी शुक्ला यांनी विविध काव्यपंक्तीतून आपले अनुभव कथन करून प्रेक्षकांची मन जिंकलीत! सर्व वक्त्यांचे परीक्षण निरीक्षण समीक्षण करणारे– महाराष्ट्र साहित्य परिषद तळेगाव शाखेचे प्रथम अध्यक्ष मा प्राचार्य सुरेश अत्रे सरांनी स्पर्धकांचा निकाल व्यक्त करताना सर्व स्पर्धकांच मनापासून कौतुक केलं! अभिनंदन केलं! अत्रे सर आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की– प्रत्येकाला योग्य क्रमांक देणं हे किती अवघड होतं हे मला खरोखरच शब्दात व्यक्त करता येत नाही हे प्रांजळपणे त्यांनी नमूद केलं! वक्त्यांनी व्यक्त केलेल्या सर्व आठवणींची- साठवण” -म्हणून एक कथासंग्रह आपण प्रकाशित करावा अशीही नम्र सूचना त्यांनी केली! प्रतिभासंपन्न कवी अत्रे सरांनी— भूतकाळातील व्यक्ती- प्रसंग याचा दृश्य पडदाच प्रत्यक्ष आपल्या काव्यपंक्तीतून सादर करून आपल्या अभ्यासपूर्ण मनोगताची समाप्ती केली! उपाध्यक्ष डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला- ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद कै राजाराम देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली! त्यानंतर कार्यवाह सौ गीता वालावलकर यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवला! त्यानंतर– अध्यक्ष महोदय श्री सुधाकर रेम्बोटकर यांनी समारंभाचे अध्यक्ष श्री सुरेशअत्रे सरांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला1 त्याबरोबरच प्रेक्षकांचही स्वागत केलं! प्रास्ताविकात- डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी– परमेश्वराने प्रत्येकाला प्रदान केलेल्या प्रतिभेचा– साहित्य संस्कृती संगीत नृत्य अशा विविध क्षेत्रातील अविष्कार -जर योग्य वेळी आपण दाखवला नाही- तर त्या प्रतिभेला निश्चितच गंज चढेल! मग पश्चातापाची वेळ येईल पण पण– त्यावेळी वेळ मात्र निघून गेलेली असेल- त्यापेक्षा आलेल्या संधीचं सोनं करणं हे -फक्त आणि फक्त आपल्याच हाती असतं! यातूनच व्यक्तिमत्त्व विकास आणि स्व परिचय समाजाला आपण देऊ शकतो हे विविध दृष्टांत आणि काव्यपंक्तीतून डॉक्टर भंडारी यांनी स्पष्ट केल! या स्पर्धेतील मनोगत सादरीकरणातील– प्रथम क्रमांक-  दिगंबर कुलकर्णी! द्वितीय क्रमांक-  प्राची साठे- तृतीय क्रमांक – मीराताई फल्ले आणि इतर स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला! कार्यकारी मंडळातील  विठ्ठल कांबळे यांनी परीक्षक_प्राचार्य सुरेश अत्रेसर आणि प्रेक्षकांचे आभार मानलेत! प्रार्थनेनंतर अल्पोपहाराने या उपक्रमाची सांगता झाली!.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!