क्रीडा व मनोरंजन

राज्य टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन परभणी, बीड व मुंबई, यवतमाळ व उपांत्य फेरीत

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी: बाळ तोरसकर

चिखली, टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व टेनिस महाराष्ट्र राज्य असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 24 वी राज्य टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धेचे चिखली येथे दि. २४ सप्टेंबर रोजी शानदार उद्घाटन झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शंतनु भाऊ बोंद्रे उद्घाटक संदीप शेळके अध्यक्ष राजर्षी शाहू परीवार तर प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशनचे सरचिटणीस डॉ. व्यंकटेश वांगवाड महाराष्ट्र राज्य सचिव गणेश माळवे, सहसचिव किशोर चोधरी, राज्य कोषाध्यक्ष दिनेश सिंगाराम, तांत्रिक समिती चेअरमन प्रफुल्लकुमार बन्सोड,यांची उपस्थिती होती या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून 300 मुले व मुली खेळाडू संघ मार्गदर्शक उपस्थित होते. या स्पर्धेतून तामिळनाडू येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड समिती अशोक शिंदे (मुंबई) रामेश्वर कोरडे (औरंगाबाद) विभागीय सचिव जयदीप सोनखासकर, प्रफुल कुमार बनसोड रेफरी बोर्ड चेअरमन दिनेश सिंगाराम कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य टेनिस हॉलीबॉल संघटना यांची उपस्थिती होते.
या स्पर्धेमध्ये सब जुनियर मुली गटात बीड व परभणी तसेच ज्युनिअर मुनी गटात परभणी व बीड तसेच मुंबई व परभणी या संघांनी अंतिम फेरी गाठली या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून सुमारे 300 खेळाडू प्रशिक्षक व्यवस्थापक यांची उपस्थिती होती स्पर्धेसाठी पंच म्हणून गणेश पाटील,राजेंद्र माघाडे, राहुल पेटकर, संतोष शिंदे ,गणेश कलंगुळ, बंडू जमदाडे, अभिषेक सोनवणे, सतीश नावाडे, यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे संचालन प्रा. रवींद्र महाडिक तर आयोजन समितीचे सचिव आभार देवानंद नेमाने यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!