आपला जिल्हासामाजिक

संस्कृत संभाषण वर्गाचा सांगता समारंभ संपन्न.

दिनांक 30 जून ते नऊ जुलै या काळात संस्कृत संभाषण कौशल्याचा वर्कशॉप तळेगाव स्थित डॉक्टर दीपक शहा लायन्स हॉलमध्ये घेण्यात आला..

Spread the love

संस्कृत संभाषण वर्गाचा सांगता समारंभ संपन्न.Concluding ceremony of Sanskrit conversation class concluded.

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे वार्ताहर, १२ जुलै.

दिनांक 30 जून ते नऊ जुलै या काळात संस्कृत संभाषण कौशल्याचा वर्कशॉप तळेगाव स्थित डॉक्टर दीपक शहा लायन्स हॉलमध्ये घेण्यात आला होता.  या कार्यशाळेचा समारोप रविवार दिनांक नऊ जुलै रोजी लायन्स हॉलमध्ये प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.  मंजुषा तेलंग,  ज्योती मुंगी मॅडम, वसुधा साठे व  सोनल जोशी यांच्या अथक प्रयत्नातून आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या तीन कार्यशाळा यशस्वी झाल्यात.

ला.अध्यक्ष डॉक्टर अनिकेत काळोखे व समन्वय अधिकारी डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी संयोजक आणि विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक केलं. अध्यक्षांनी आणि डॉक्टरांनी आपला संवाद संस्कृतातून सादर केल्याने सर्वांना सुखद धक्का बसला. ज्येष्ठ लायन नंदू शेठ काळोखे यांनी प्रत्यक्ष स्वतः अनुभवलेलं संस्कृत भाषेचे महत्व आपल्या मनोगतात व्यक्त केल.

या समारंभास ज्येष्ठ लायन भरत पोद्दार शेखर चौधरी आणि खजिनदार प्रकाश पटेल हे ही लायन सदस्य उपस्थित होते. शीतल सुरालकर आणि श्रीनिवास पेंडसे या विद्यार्थ्यांनी संस्कृत मधून संवाद साधला तर  आनंद पटवर्धन यांनी संपूर्ण सूत्रसंचालन संस्कृत भाषेत सादर केलं. यावरून या कार्यशाळेच्या यशाची प्रचिती प्रत्यक्ष उपस्थितानी अनुभवली. सोनल जोशी यांनी सर्वांच स्वागत केलं,  मंजुषा मॅडमनी प्रास्ताविक केलं, ज्योती मुंगी मॅडमनी सर्वांचे आभार मानले. सांघिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!