आपला जिल्हापर्यटनमहाराष्ट्र

ढाकचीभैरी  परिसरात वर्षाविहारला हरवलेल्या मुलांचा  घेतला शोध..

घनदाट जंगलामध्ये मिसिंग झाल्याबाबत डायल ११२ कॉल रात्री ९ वा.चे सुमारास प्राप्त झाल्याने कामशेत पोलीस स्टाफ व जांभवली गावातील स्वयंसेवक पोलीस मित्रांच्या मदतीने शोध घेतला गेला..

Spread the love

ढाकचीभैरी  परिसरात वर्षाविहारला हरवलेल्या मुलांचा  घेतला शोध..Search for the missing children during summer vacation in Dhakchibhairi area..

आवाज न्यूज :  मावळ प्रतिनिधी, १७ जुलै.

ढाकचीभैरी कोंडेश्वर जांभवली गाव परिसरात वर्षाविहार करीता( ट्रेकिंग) मिसिंग झालेल्या मुलांचा शोध घेतला.
दि१५ जुलै रोजी दु.१२ वा.सुमारास कोंडेश्वर, जांभवली ढाकभैरी परिसरात ट्रेकिंग करता गेलेले युवक  १) प्रसाद गोविंद शिंदे वय २६ रा.भोसरी पुणे २)  यशवंत श्रीपत साने वय २७ रा. चिखली पुणे ३)  रोहन पाटील वय २८ रा. आकुर्डी पुणे ४)  रोहित सोनवणे वय २६ रा.देहू पुणे हेडोंगरदऱ्या, घनदाट जंगलामध्ये मिसिंग झाल्याबाबत डायल ११२ कॉल रात्री ९ वा.चे सुमारास प्राप्त झाल्याने कामशेत पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सदरची माहिती मा.पोलीस अधीक्षक अंकित गोयल ,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे ,सहाय्यक पोलीस अधीक्षक मा.सत्यसाई कार्तिक  यांना कळवून त्यांचे मार्गदर्शन सूचनाप्रमाणे डोंगरदऱ्यामध्ये रात्री रस्ता हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी तात्काळ मदत कार्य सुरू केले.

पोलीस स्टाफ, जांभवली गावातील स्वयंसेवक पोलीस मित्र अनंता कदम, ज्ञानेश्वर कदम, शंकर कदम, अमोल कदम,सागर कदम, बाळू पवार सोबत इतर पोलीस मित्र यांना मदतीसाठी पाठवले.मोबाईल फोनवरून मिसिंग मुलांच्या संपर्कात राहून त्यांना धोका न पत्करता आहे त्या ठिकाणी थांबण्यास सांगून वेळोवेळी सूचना व धीर देऊन त्यांचा शोध घेतला. त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षितरित्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जंगलातून बाहेर आणण्यात आले. मिसिंग युवकांनी ते ट्रेकिंग करीत असताना डोंगर दऱ्यातील दाट धुक्यामुळे व नंतर अंधार झाल्याने रस्ता चुकल्याचे सांगून संकटाच्या वेळी मदत करून जीव वाचवल्याबद्दल पोलिसांचे व मदत करणाऱ्या स्थानिकांचे आभार मानले.

ट्रेकिंग करता गेलेल्या व संकटात सापडलेल्या सदर युवकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पोलिसांना जांभवली गावचे स्वयंसेवक पोलीस मित्रांची मदत झाल्याने कामशेत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांच्याकडून त्यांचे कार्याचा सत्कार करण्यात आला आहे.  पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांना धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे व पोलिसांच्या सूचना पाळून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक साहेब यांनी वर्षा विहार सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांचे गर्दीवर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियमन व संकटकालीन परिस्थितीत स्वयंसेवकाची मदत व्हावी यासाठी लोणावळा पोलीस स्वयंसेवक दल याचे सदस्य बनण्यासाठी संबंधित लिंक वर माहिती भरून नोंदणी करण्याचे स्थानिक नागरिकांना आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!