आपला जिल्हाऐतिहासिकपर्यटनमहाराष्ट्र

सोमवती अमावस्येपासून पावसाची जोरदार बॕटींग.

पाटण, औंढोलीतील डोंगरावरील पांढरे शुभ्र धबधबे पाहून पर्यटक सुखावले.

Spread the love

सोमवती अमावस्येपासून पावसाची जोरदार बॕटींग , पाटण , औंढोलीतील डोंगरावरील पांढरे शुभ्र धबधबै पाहून पर्यटक सुखावले.Tourists were happy to see the white waterfalls on the mountains in Patan, Aundholi after heavy rains from Somvati Amavasya.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, १९ जुलै.

सोमवती अमावस्येपासून पावसाची जोरदार बॕटींग , पाटण , औढोलीतील डोंगरावरील पांढरे शुभ्र धबधबे पाहून पर्यटक सुखावले आहेत.कालअखेर चांगला पाऊस झाला. सोमवारी २१२ मी.मीटर पाऊस झाला.आजही संततधार पाऊस सुरूच आहे. काही सखल भागात पावसाचे पाणी रस्त्यावर आलेले पहायला मिळाले.डोंगरालगत घरे असणाऱ्या नागरिकांकडून सतर्कता बाळगण्याची गरज ,डोंगरालगत व कड्याखाली राहणाऱ्या ग्रामस्थांचे वतीने सावधपणे , जागरूक राहणे गरजेचे आहे. राञीअपराञी जागसूक राहावे.

अतिपावसाने काही भागात दरडी कोसळण्याची भीती असलेल्या गावांसाठी भीज पाऊस धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे , एकदम डोंगरालगत , कड्याखाली असणारी पाटण, बोरज, देवले या बरोबरच भुशीगाव येथील ग्रामस्थांतर्फे सावधानपणे पावसावर लक्ष ठेवणे हिताचे राहणार आहे. देवले गावाचे जवळून मुंबई पुणे द्रूतगतीमार्गाच्या जवळचा सर्वीस रस्ता , डोंगरालगत असल्यामुळे दगडगोटे खाली येण्याची शक्यता आहे.

संततधार पावसामुळे पाटणला सकाळी सातचे लोकलपासूनच पुण्याचे पर्यटकांची गर्दी विसापूर गडाकडे मार्गस्थ होताना दिसून येत होती. औंढेखुर्द , औंढोली येथून दुधिवरेखिंड मार्गे पवनाधरणाकडे व लोहगड कडे पर्यटकांची गर्दी होताना दिसून आली.

पाटणमधील मच्छिंद्र कोंडभर , महादू तिकोणे , माजी सरपंच गुलाबराव तिकोणे , तसेच अनेक ग्रामस्थांतर्फे सांगण्यात आले , की सकाळी दोन लोकल लवकर येतात , तसेच साडेदहा चे लोकलला गर्दी होते.कामगारवर्ग , शाळा , महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचेकडून पाटणमार्गे मालेवाडी , तसेच धबधबा मार्गावरून विसापूर गडाकडे सकाळीच चार पाचशे पर्यटक येतात.यात तरूणांचा व मिञपरिवार , मैञिणींचा यामधे जास्त भरणा असतो.पाटणचे गावाचे वरून पूर्वेकडे व दक्षिणेकडे धबधाबे फेसाळताना दिसतात.
येथील डोंगरालगत सुंदर धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.तसेच या रस्त्यावर दोन तीन ठिकाणी पाणी साचले होते , तर काही ठिकाणी रस्त्याचे वरून पाणी वाहताना दिसत होते.

सुदाम नगरीकडे जाणाऱ्या रस्त्याची कामे पूर्ण न झाल्याने या भागात अर्धवट पुढील रस्ता केला , पण मुख्य रस्त्याला जोडून रस्ताच केला नसल्याने शेकडो लोकांची गैरसोय होते.
औंढोली , दुधिवरेखिंड , पवनाधरणाकडे पर्यटकांची गर्दी वाढू लागली : औंढोली , दुधिवरेखिंड , पवनाधरणाकडे , लोहगड , तुंग , तिकोणे किल्याकडे जाणाऱ्या शेकडो पर्यटकांची दुधिवरेखिंड येथे गर्दी होते.तिथून दोन मार्ग दोन दिशेला जातात.दुधिवरेखिंड येथे दगडाचे विशिष्ट आकारातून छञपती शिवाजी महाराज यांचा चेहरा दृष्टिकोनातून पहायला मिळतो. येथे सेल्फी घेण्यासाठी , गाणी गाणे , नृत्य करणे असे काही विविध मनोरंजन करायला व्हिडीओ काढायला पर्यटकांना मन आवरत नाही.

लोहगड रस्त्यावर खिंडीजवळच खोल खड्डेचखड्डे : लोहगड किल्याकडे व घेरेवाडी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डेचखड्डे पडल्याचे दिसले.येथे सार्वजनिक बांधकाम खात्याला कळविण्यात आल्याने पाऊस थोडा ओसरला , की तात्काळ खड्डे आरएमसी लोडर बोलावून खड्डे भरले जाणार असल्याचे स्थानिक दुकानदारांनी व कैलास मांडेकर व सदाशिव मांडेकर यांनी सांगितले.

येथून पूर्वैकडे डोंगरावर पांढरेशुभ्र धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.मक्याचे कणीस , , कांदाभजी , चहा , तसेच मॕगी , वडापाव , व घरघुती चुलीवरील जेवणाचा आस्वाद घ्यायला पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!