आपला जिल्हाराजकीय

तळेगाव स्टेशन काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी योगेश पारगे यांची निवड.

मावळ तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करणार. तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ

Spread the love

तळेगाव स्टेशन काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी योगेश पारगे यांची निवड.Selection of Yogesh Parge as working president of Talegaon Station Congress.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २० जुलै.

तळेगाव स्टेशन काँग्रेस आय कमिटीच्या कार्याध्यक्ष पदी योगेश पारगे यांची निवड करण्यात आली आहे. योगेश पारगे तळेगाव स्टेशन मधील संघटनेतील चळवळीतील कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहू तसेच नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे यावेळी योगेश पारगे यांनी प्रतिपादन केले.

योगेश पारगे यांना मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या व जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, जिल्ह्याचे नेते रामदास काकडे, प्रदेश सदस्य ॲड .दिलीप ढमाले, तालुका कार्याध्यक्ष ॲड खंडू तीकोणे ,तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले, पुणे जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज, मावळ तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत, आदी मान्यवर उपस्थित होते.

मावळ तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करणार असल्याचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, प्रदेश सदस्य ॲड. दिलीप ढमाले, जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!