आरोग्य व शिक्षण

लोणावळा महाविद्यालयास माजी विद्यार्थ्यांकडून पिण्याच्या पाण्याचा कुलर व फ्युरिफायर भेट

Spread the love

लोणावळा : लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे डॉ. बी एन पुरंदरे कला,एस.एस.जी.गुप्ता वाणिज्य व एस.एस.ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय लोणावळा, महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी तथा मावळ तालुका भाजपा युवा मोर्चा चे कार्याध्यक्ष व महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी  अर्जुन पाठारे व नंदू विश्वासराव माजी उपसरपंच औंढे यांच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थी , शिक्षक, कर्मचारी, पालक यासाठी महाविद्यालयात पिण्याच्या पाण्याचा कुलर व फ्युरिफायर भेट देण्यात आला.

यावेळी अर्जुन पाठारे यांनी महाविद्यालयाचा विकास, महाविद्यालयाची वाटचाल पाहून आनंद होत आहे तसेच त्यांनी विद्यार्थी हिताबाबत , विद्यार्थी हाच महत्वाचा केंद्रबिंदू आहे असे मत व्यक्त केले.तसेच या मदतीखेरीज जमेल तेवढे यापुढे ही महाविद्यालयास मदत करण्याचे आश्वासन दिले व सर्वांचे आभार मानले.

यावेळी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव दत्तात्रय पाळेकर, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे खजिनदार विजय दर्यानानी उपस्थित होते. यावेळी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त आणि कायदेशीर सल्लागार अँड.नीलिमा खिरे यांनी आपल्या अध्यक्षणीय मनोगतात देणगीदारांचे, माजी विद्यार्थी वर्गाचे कौतुक केले. तसेच शिक्षक वर्गाचे कौतुक केले, संस्थेचा विकास करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत असे मत व्यक्त केले.

यावेळी माजी विध्यार्थी संघाचे उपाध्यक्ष  विशाल विकारी यांनी आपल्या मनोगतात माजी विध्यार्थी संघ हा महाविद्यालयाच्या नेहमी पाठीशी आहे. जमेल तेव्हढे माजी विध्यार्थ्यांकडून सहकार्य करू असे मत व्यक्त केले.

यावेळी माजी विध्यर्थी संघाचे सचिव प्रा.दीपक तारे उपस्थित होते, तसेच उपप्राचार्य डॉ. व्ही.ए.पाटील, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.सविता पाटोळे,आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. दिगंबर दरेकर आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावित डॉ. निलेश काळे यांनी केले. तर आभार डॉ. पवन शिनगारे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!