आपला जिल्हाराजकीय

तळेगाव स्टेशन महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संगीता दुबे यांची निवड.

महिलांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भरीव कार्य करणार. संगीता दुबे

Spread the love

तळेगाव स्टेशन महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संगीता दुबे यांची निवड.Selection of Sangeeta Dubey as Vice President of Talegaon Station Mahila Congress.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २१ जुलै .

तळेगाव स्टेशन काँग्रेस( आय ) कमिटीच्या महिला उपाध्यक्ष पदी सौ संगीता दुबे यांची निवड करण्यात आली आहे. संगीता दुबे ह्या तळेगाव स्टेशन परिसरातील स्त्री शक्ती भाजी मंडई च्या अध्यक्षा आहेत. काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहू तसेच नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे यावेळी संगीता दुबे यांनी प्रतिपादन केले. संगीता दुबे यांना मावळ तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा. प्रतिमा हिरे यांच्या व जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, जिल्ह्याचे नेते रामदास काकडे, प्रदेश सदस्य ॲड .दिलीप ढमाले, तालुका कार्याध्यक्ष ॲड खंडू तीकोणे ,तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले, पुणे जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज, मावळ तालुका प्रवक्ते मिलिंद अच्युत, आदी मान्यवर उपस्थित होते.

तळेगाव शहरात संगीता दुबे यांचे महिलांच्या संघटनांमध्ये भरीव योगदान आहे.महिलांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भरीव कार्य करणार असल्याचे संगीता दुबे यांनी यावेळी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षाचे संघटकनात्मक कार्य मजबूत करण्यासाठी महिला वर्गाने पुढाकार घेण्याचे जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांनी आवाहन केले आहे.
याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, प्रदेश सदस्य ॲड. दिलीप ढमाले, जिल्ह्याचे नेते रामदास काकडे यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!