आपला जिल्हाऐतिहासिकसामाजिक

पवन मावळातील तुंग किल्ल्यावरील कड्याचा भाग कोसळण्याची शक्यता..

जिल्हा आपत्ती निवारण विभागाने याची दखल घेऊन याची खात्री करावी, तसेच धोकादायक ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी..

Spread the love

पवन मावळातील तुंग किल्ल्यावरील कड्याचा भाग कोसळण्याची शक्यता..There is a possibility of the part of the cliff on the Tung Fort in Pawan Maval collapsing.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी,२१ जुलै.

दरडी कोसळण्याच्या घटनेमुळे अनेक गड, किल्ल्यांवरील धोकादायक कडे आणि दरडी कोसळण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.  मावळ तालुक्यातील तुंग किल्ल्याचा तुंगी गावच्या दिशेचा एक कडा कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पवन मावळातील  वाहणारे धबधबे, पवना धरण व येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी तसेच लोहगड विसापूर व तुंग किल्ला पाहण्यासाठी व त्याला भेट देण्यासाठी इतिहास प्रेमी व भटकंती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. तुंग या गडावर जाण्यासाठी तुंगी गावातूनच रस्ता आहे. गडाच्या पायथ्याशी तुंगी हे गाव आहे. याच गावच्या दिशेने असलेल्या एका कड्याचा मोठा भाग सुटलेला आहे.कड्याचा हा भाग कधीही कोसळण्याची भीती स्थानिक नागरिक तसेच शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्याकडून वर्तवली जात आहे.जिल्हा आपत्ती निवारण विभागाने याची दखल घेऊन याची खात्री करावी, तसेच धोकादायक ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!