आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनसामाजिक

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका. सविता एच ट्रॅव्हिस यांची मिसेस इंडिया प्राईड ऑफ नेशन तर्फे मिसेस ॲचिवर २०२३ म्हणून निवड.

Spread the love

·प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका. सविता एच ट्रॅव्हिस यांची मिसेस इंडिया प्राईड ऑफ नेशन तर्फे मिसेस     ॲचिवर २०२३ म्हणून निवड.Principal of Pratibha International School. Savita H Travis selected as Mrs. Achiever 2023 by Mrs. India Pride of Nation.

आवाज न्यूज : गुलामअली भालदार चिंचवड प्रतिनिधी, २४ जुलै.

दि.२३ जयपूर येथे आयोजित मिसेस इंडिया प्राईड ऑफ नेशन या कार्यक्रमात प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल च्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅवीस यांची मिसेस ॲचिवर २०२३ म्हणून निवड झाली. सविता ट्रॅव्हिस या मिसेस वर्ल्ड इंटरनॅशनल इंटेलेक्चुअल २०२३, ग्लॅमर गुडगाव मिसेस वर्ल्ड इंटरनॅशनल २०२२ च्या टॉप ५ स्पर्धकांपैकी एक असून सध्या प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहे, त्या प्रार्थना ग्रुप लीडर एसएफएक्स, चिंचवड येथे अध्यक्ष पदी कार्यरत आहेत. तसेच, सहोदय स्कूल कॉम्प्लेक्स, पुणे सीबीएसई २०२२ च्या सीबीएसई डिस्ट्रिक्ट कॉनऑर्डिनेटर ३ च्या समन्वयक म्हणून काम पाहत होते.

२३ जुलै रोजी जयपूर येथे आयोजित मिसेस इंडिया प्राईड ऑफ नेशन या कार्यक्रमात त्यांना मिसेस ॲचिवर २०२३ या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. ग्लॅमर गुडगाव मिसेस वर्ल्ड इंटरनॅशनलच्या श्रीमती बरखा नांगिया आणि अभिषेक नांगिया यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या निवडीचे कमला शिक्षण संकुलाचे अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार भूपाली शहा, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे तसेच, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!