आरोग्य व शिक्षण

राष्ट्रवादीचे बबनराव भेगडे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा 

Spread the love

वडगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे सोपविला आहे.त्यामुळे पक्षाच्या अंतर्गत निवडणूक प्रक्रियेनुसार नवीन तालुकाध्यक्ष यांची आठवड्याभरात निवड होण्याची शक्यता आहे.

बबनराव भेगडे यांनी तब्बल गेली तेरा वर्षे तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.पक्षाचा तालुक्यात आमदार नसतानाही आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी पक्षाची स्थिती मजबूत केली. गेल्या तेरा वर्षात त्यांनी चार वेळा तालुका अध्यक्ष पद भूषविले आहे .तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती,जिल्हा बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पद व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ही पदे ही त्यांनी भूषविली आहेत.

नवीन कार्यकर्त्यांना पक्षामध्ये कामाची संधी मिळावी म्हणून तसेच कालावधी पूर्ण झाल्याने राजीनामा देत असल्याचे भेगडे यांनी सांगितले. परंतु बाळासाहेब नेवाळे यांना राष्ट्रवादीकडून जिल्हा दूध संघाची उमेदवारी जाहीर झाली आहे.तर दुसरीकडे तालुका अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.त्यामुळे भेगडे यांच्या राजीनाम्याच्या मागे नाराजी असल्याची चर्चा राजकीय जाणकारां मध्ये आहे. तर खरच पुढील संधी नवीन चेहऱ्याला मिळणार की प्रस्थापितांच्या गळ्यातच तालुकाध्यक्ष पदाची माळ पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!