आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

लोणावळ्यातील भुशीडॕम पर्यटकांचे आकर्षण ओव्हरफ्लो !

Spread the love

लोणावळ्यातील भुशीडॕम पर्यटकांचे आकर्षण ओव्हरफ्लो !Bhushidam in Lonavala tourist attractions overflow!

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी २ जुलै .

लोणावळ्यातील भुशीडॕम पर्यटकांचे आकर्षण ओव्हरफ्लो झाले आहे.शनिवारी पहाटेपर्यत पावसाच्या जोरदार सरीवर सरी कोसळत होत्या.पर्यटकांची पंढरी म्हणून ओळखले जाणारे लोणावळा हिलस्टेशन , थंडगार हवेचे ठिकाण व गडकिल्ले , लेण्या , आणि धरणे , तसेच इंद्रायणी सारखी पविञ नदी आणि याच भूमित टायगर पाॕईंट , लायन्स पाॕईंट , गिधाड तलाव , टाटालेक , भुशीधरण व भुशीधरणाचे मागील सत्यम शिवम सुंदरम ! हा धबधबा ! तसेच कार्ला भाजे लेण्या ! राजमाची पाँईंट , राजमाची किल्ला , लोहगड विसापूर , तिकोना , तुंग , कोराईगड हे गडकिल्ले पर्यटकांचेसाठी पावसाळ्यात पर्वणी ठरणार आहे ! ! !

भुशीडॕम भरल्याने पर्यटकांची तोबा गर्दी येथे पहायला मिळेल.येथे पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते.रोज चार पाच पोलिसांचा चोख बंदोबस्त पायऱ्या व धरणाचे बांधाजवळ असतो.यामुळे पर्यटकांकडून धरणात पोहण्याचे धाडस केले जाणार नाही , अशी काळजी पर्यटक घेतील का ?  असे माजी नगरसेवक माणिक मोतीराम मराठे यांनी आवाज शी बोलताना सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!