आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

संपदा सहकारी बँक लि, पुणे यांचे अर्थ साक्षरता अभियान डिंग्रजवाडी, कोरेगाव भिमा येथे संपन्न..

आपल्या गावातून सरकारला जास्तीत जास्त इन्कम टॅक्स भरला जाऊन तालुक्यात गावाने एक सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरणारे गाव असा आदर्श निर्माण करावा.राहुल गव्हाणे, व्यवस्थापन मंडळ संचालक.

Spread the love

संपदा सहकारी बँक लि, पुणे यांचे अर्थ साक्षरता अभियान डिंग्रजवाडी, कोरेगाव भिमा येथे संपन्न..Artha Literacy Mission of Sampada Sahakari Bank Ltd, Pune completed at Dingrajwadi, Koregaon Bhima..

आवाज न्यूज : प्रतिनिधी, ४ ऑगष्ट.

संपदा सहकारी बँक लि., पुणे शाखा कोरेगाव भिमा यांचे वतीने बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या शुभारंभ प्रसंगी हनुमान मंदिर, डिंग्रजवाडी, कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे येथे दिनांक २९ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता संपन्न झाला. कार्यक्रमात सुरुवात विठ्ठल रुख्मिणी व हनुमान च्या मूर्तीच्या पूजनाने झाली.

तुषार टाव्हरे यांनी मा. संचालक. मल्लिकार्जून सर्जे साहेब व व्यवस्थापन मंडळ संचालक. राहुल गव्हाणे तसेच डिंग्रजवाडी गावचे सरपंच. यशवंत गव्हाणे यांचे व उपस्थितांचे बँकेच्या वतीने स्वागत केले. शाखा व्यवस्थापक. अनिल पारगे यांनी उपस्थितांना बँकेची स्थापनेपासूनची माहिती दिली, तसेच बँकेची सद्य स्थितीतील बँकेची अर्थिक स्थितीची माहिती दिली, बँकेला २०२२-२३ मध्ये ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला असून एन.पी.ए.० टक्के झाल्याचे सांगितले.

पारगे यांनी बँकेचा अर्थ साक्षरता अभियानामागचा हेतू समजावून सांगून अर्थ साक्षरतेमुळे आपल्याकडे असलेल्या पैशाचे नियोजन कसे करावे, पैसा कुठे व कसा गुंतवावा, अर्थ साक्षरतेमुळे होणारा स्वतःचा विकास व त्याचा देशाला होणारा फायदा याची उदाहरणासह माहिती दिली.

मा. संचालक. माक्कि अर्जून सर्जे साहेबांनी उपस्थित बचत गटांच्या महिलांना महिला करू शकतात अश्या व्यवसायाची माहिती दिली, तसेच त्यांना काही अडचणी आल्यास बँक त्यांना प्रशिक्षण व आर्थिक सहाय्य देखील करेल असे सांगितले. तसेच डिंग्रजवाडी गावचे सरपंच  यशवंत गव्हाणे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

व्यवस्थापन मंडळ संचालक. राहुल गव्हाणे यांनी तरुणांनी आपल्याकडे असलेल्या शेतीच्या माध्यमातून शेती पूरक उद्योग सुरु करावेत, बँकेत खाते उघडून त्यात व्यवहार वाढविणे, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे होणारे फायदे व त्यापासून देशाच्या प्रगतीला लागणारा हातभार याची माहिती दिली, तसेच आपल्या गावातून सरकारला जास्तीत जास्त इन्कम टॅक्स भरला जाऊन तालुक्यात गावाने एक सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरणारे गाव असा आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले, तसेच उपस्थितांचे कार्यक्रमाला उपस्थीत राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानले.

त्यानंतर चहापान होऊन कार्यक्रम समाप्त झाला. सदर कार्यक्रमात डिंग्रजवाडी गावातील जवळपास १७ महिला बचत गटाच्या प्रतिनिधी महिला, तरुण वर्ग व वयोवृद्ध मोट्या प्रमाणावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!