देश विदेशमहाराष्ट्रराजकीय

काँग्रेसचा विजयोत्सव..

Spread the love

काँग्रेसचा विजयोत्सव .. Congress Victory Festival..

आवाज न्यूज : गुलाम अली भालदार  चिंचवड  प्रतिनिधी ४ ऑगष्ट.

खासदार राहुल गांधी यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या सुडबुध्दीच्या राजकारणातून गुजरात राज्यात खोटी केस दाखल करण्यात आली होती. त्यावर गुजरातमधील सुरत येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आज मा. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा भारतीय संविधानाचा व सत्याचा विजय असून पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून विजयोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नेते मानव कांबळे, महिला अध्यक्षा सायली नढे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, रोजगार व स्वयंरोजगार अध्यक्ष विशाल सरवदे, कार्याध्यक्षा सुप्रिया पोहरे, स्वाती शिंदे, निर्मला खैरे, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, गंगा नाईक, उमेश बनसोडे, इस्माईल संगम, राजू ठोकळ, प्रा. किरण खाजेकर, बाबासाहेब बनसोडे, किरण नढे, मिलिंद फडतरे, हरीश डोळस, जितेंद्र छाबरा, सतीश भोसले, नितीन खोजेकर, गौतम ओव्हाळ आदिसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!