आपला जिल्हासामाजिक

प्रगतीशील शेतकरी दत्ताञेय ढाकोळ यांची भाजे विकास सोसायटी चे चेअरमनपदी निवड ..

ढाकोळ यांची भाजे विकास सोसायटी चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मळवली कार्ला परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे.

Spread the love

प्रगतीशील शेतकरी दत्ताञेय ढाकोळ यांची भाजे विकास सोसायटी चे चेअरमनपदी निवड ..Progressive farmer Dattaneya Dhakol has been elected as the chairman of Vegetable Development Society.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी ५ ऑगष्ट.

‌  सदापूर गावचे प्रगतीशील शेतकरी दत्ताञेय रघुनाथ ढाकोळ ( पाटील )यांची भाजे विकास सोसायटी चे चेअरमनपदी निवड चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली आहे.
ढाकोळ यांची भाजे विकास सोसायटी चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मळवली कार्ला परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे.

जुलै अखेर वडगाव मावळ येथील सहाय्यक निंबंधक कार्यालयात झालेल्या या विशेष सभेमधे पीठासन आधिकरी म्हणून सहाय्यक निबंधक मंदार कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले. प्रथम सभा सुरू झाल्यावर आलेल्या आर्जांची छानणी झाली. त्यात दत्ताञेय ढाकोळ यांचा एकमेव अर्ज आल्याने व तो छाननी मधे वैध झाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी.कुलकर्णी यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी त्यांचा कार्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी संचालक व माजी चेअरमन बाळासाहेब शिवराम आंबेकर , गणेश विष्णू दिघे , व्हाईस चेअरमन वसंत पांडुरंग आंबेकर , दामू महादू दळवी , रघुनाथ केरू दाभाडे , भरत सदाशिव तिकोणे , मच्छिंद्र नथू तिकोणे , अनंता भिकुजी ओव्हाळ , संचालिका व खरेदी विक्री संघाच्या माजी सभापती मनिषा जयराम आंबेकर , माजी उपसरपंच विद्या अनिल तिकोणे यांनी उपस्थितीत राहून अभिनंदन केले.
यावेळी सदापूर गावातील  दत्ताञेय ढाकोळ यांचे निकटचे सहकारी व ग्रामस्थांतर्फे पंढरीनाथ रघुनाथ ढाकोळ ( पोलिस पाटील ), कृषिनिष्ठ शेतकरी नाथा अनंता ढाकोळ , सुनिल दामोदर दळवी ( माजी उपसरपंच ) पूजा दिनेश खराडे (सदस्या ),गणेश धोंडू ढाकोळ , ( सदस्य) , विश्वनाथ रामभाऊ खराडे ( अध्यक्ष , सदापूर ट्रस्ट ,) प्रगतीशील शेतकरी संजय रघुनाथ ढाकोळ , मनोहर बबन घोजगे आदी उपस्थित होते.. यावेळी पाटणचे माजी सरपंच
गुलाबराव तिकोणे , भाजेचे माजी सरपंच व भाजे सोसायटी चे माजी चेअरमन नंदकुमार पदमुले यांनी पुष्पगुच्छ देवून  ढाकोळ यांचे अभिनंदन केले. नवनिर्वाचित चेअरमन यांनी  पोटोबा जोगेश्वरी मंदिरात दर्शन घेवून शेतकरी सभासदांना जास्तीत जास्त कर्जे उपलब्द करून देण्यासाठी तसेच सोसायटी चे इमारतीचे डागडुजी व सुशोभिकरणाचे काम करण्यात येईल असे आवाज न्यूजशी बोलताना सांगितले.

यावेळी सदापूर गावचे ग्रामस्थ व  विठ्ठल रखुमाई तरूण मंडळांचे सभासद प्रशांत ढाकोळ , रोशन ढाकोळ , प्रज्वल ढाकोळ , विश्वजित ढाकोळ , राजूभाऊ आंबेकर , दियश ढाकोळ , विरभद्र ढाकोळ , आदित्य ढाकोळ , संकेत ढाकोळ , विश्वनाथ ढाकोळ , दिलीप ढाकोळ , विठ्ठल गायकवाड आदीँनी ढाकोळ यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!