महाराष्ट्रमावळ

कोथुर्णेतील निर्भया तथा कै.स्वरा चांदेकर हिच्यावरील अमानुष अत्याचार व खूनप्रकरणी अद्याप आरोपीस कठोर शिक्षा नाही..

पिडीतेच्या वारसांना पाच लाखाची मदत देण्यापासून राज्यसरकारला आठवण करण्यासाठी ह्युमन राईटस् चा पुढाकार ..

Spread the love

कोथुर्णेतील निर्भया तथा कै.स्वरा चांदेकर हिच्यावरील अमानुष अत्याचार व खूनप्रकरणी अद्याप आरोपीस कठोर शिक्षा नाही , पीडीतेच्या वारसांना पाच लाखाची मदत देण्यापासून राज्यसरकारला आठवण करण्यासाठी ह्युमन राईटस् चा पुढाकार ..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी ५ ऑगष्ट.

कोथुर्णेतील निर्भया तथा कै.स्वरा चांदेकर हिचेवरील अमानुष अत्याचार व खूनप्रकरणी अद्याप आरोपीस कठोर शिक्षा नाही , पीडीतेच्या वारसांना पाच लाखाची मदत देण्याबाबत ह्युमन राईटस् असोसिएशन फाॕर कमिटीचेवतीने ता.४ आॕगष्ट रोजी निर्भयाचे आई वडीलांची भेट घेण्यात आली.

आपल्या मावळ तालुक्यातील पवनमावळ भागातील लहानसे खेडेगावात ही माणुसकीला काळीमा फासणारी , निर्दयी घटना घडली होती. त्यात लहानशी चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार करून तिचा गळा दाबून शाळेच्या मागे हत्या करून तो फरारी झाला होता.कामशेत, वडगाव पोलिसांकडून व पुणे ग्रामिणचे मुख्यालयातील पोलिस तपासकामासाठी कोथुर्णे येथे आल्यावर सखोल तपास करून आरोपींच्या गावातच मुसक्या आवळून त्याला आटक केली. केस जलदगती न्यायालयाचे समोर असून आरोपीस फाशी वा कठोर शिक्षा झालेली नाही.

येथील चांदेकर या पीडीतेच्या कुटुंबातील कोथुर्णे गावातील सहा वर्षाच्या चिमुकलीची निर्घृण हत्या झाली होती.
त्या गोष्टीला दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी पूर्ण एक वर्ष झाले, अद्याप राज्य शासनाकडून जी घोषणा केलेली पाच लाख अर्थसहाय्य पीडित कुटुंबास मिळणार होते, ते अद्यापही मिळालेले नाही, संबंधित विषयाची माहिती संघटनेच्या वतीने ह्युमन राईटस् आसोसिएशन फाॕर प्रोटेक्शन कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव चौधरी यांनी घेतली व आर्थिक मदतीपासून वंचित असणाऱ्या कुटुंबास लवकरात-लवकर आर्थिक मदत मिळून देण्यासाठी संघटनेमार्फत पाठपुरावा करण्यात येईल, असे मुलीच्या वडीलास सांगण्यात आले.

यावेळी ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कमिटी चे अध्यक्ष महादेव चौधरी,पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन गाडे , मावळ तालुका कार्याध्यक्ष निरंजन कांबळे, मावळ अध्यक्ष सुमित निकाळजे , तालुका उपाध्यक्ष.कृष्णा शिळावणे , तालुका सचिवजे के गरड ,लोणावळा शहराध्यक्ष योगेश पैलकर , लोणावळा उपाध्यक्ष. उदय बोभाटे , सचिव करण गरूडे आदींनी यावेळी चांदेकर कुटूंबातील सदस्यांचे सांत्वन करून त्यांचेकडून राज्यसरकारने दिलेल्या अश्वासनाची खातरजमा करून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!