आपला जिल्हाताज्या घडामोडीपिंपरी चिंचवडमहाराष्ट्रसामाजिक

चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने मध्य रेल्वे विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार..

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी कार्यक्रम करण्यात आला.

Spread the love

चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने मध्य रेल्वे विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार..On behalf of Chinchwad Pravasi Sangha felicitated the officers and employees of Central Railway Division..

आवाज न्यूज : गुलाम अली भालदार चिंचवड, प्रतिनिधी.६ ऑगष्ट.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी कार्यक्रम करण्यात आला. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात आज आकुर्डी येथे पायाभरणी कार्यक्रम ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स अंतर्गत करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातील लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवासीयांच्या व शहरवासीयांच्या वतीने या वेळेला चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी मनोहर जेठवानी, मुकेश चूडासामा, गोविंदसिंग धावडा, नंदू भोगले, सलीम शिकलगार , आर. एस. कुमार,आदीच्या उपस्थितीत मध्य रेल्वे चे पुणे विभागाचे अतिरिक्त मंडल रेल प्रबंधक ब्रिजेश सिह यांचा शाल , पुष्पगुच्छ देऊन आभारपर सत्कार करण्यात आला.

पहिल्या टप्प्यात आकुर्डी व तळेगाव येथील रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. दुसर्या टप्प्यात चिंचवड व देहूरोड रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे चे पुणे विभागाचे अतिरिक्त मंडल रेल प्रबंधक ब्रिजेश सिह यांनी सांगितले.यावेळी चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने पिंपरी रेल्वे स्थानक तसेच इतर दापोडी, कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या समस्या तसेच आकुर्डी ते देहूरोड या दरम्यान जवळपास साडे पाच किलोमीटर अंतर आहे.

रावेत परिसरात नागरी वस्ती वेगाने वाढत असून रावेत येथे नव्याने रेल्वे स्थानक उभारण्यात यावे. पुणे लोणावळा दरम्यान रेल्वेचे चौपदरीकरण करण्यात यावे,आणि चिंचवड येथे एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा आदी समस्या निवेदन स्वरुपात मध्य रेल्वे चे पुणे विभागाचे अतिरिक्त मंडल रेल प्रबंधक ब्रिजेश सिह यांना देण्यात येणार आहे. त्या बाबत त्यांनी भेटीचे निमंत्रण चिंचवड प्रवासी संघाला दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!