आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमावळ

कुणीतरी आदर्श विद्या मंदिर ची लक्षवेधी लावा रे योगेश पारगे, समीर दाभाडे.

इंद्रायणी महाविद्यालया बाबत राजकारणी भूमिका चुकीची... कुणीतरी आदर्श विद्या मंदिर ची लक्षवेधी लावा रे .... असे गीत जनसेवा विकास समितीचे संघटक योगेश पारगे, समीर दाभाडे ,यांनी गायले आहे.

Spread the love

कुणीतरी आदर्श विद्या मंदिर ची लक्षवेधी लावा रे
योगेश पारगे, समीर दाभाडे.Someone please draw attention to Adarsh ​​Vidya Mandir..

Yogesh Parge, Sameer Dabhade.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ९ ऑगष्ट.

इंद्रायणी महाविद्यालया बाबत राजकारणी भूमिका चुकीची…
कुणीतरी आदर्श विद्या मंदिर ची लक्षवेधी लावा रे …. असे गीत जनसेवा विकास समितीचे संघटक योगेश पारगे, समीर दाभाडे ,यांनी गायले आहे.

तळेगाव शहरातील आदर्श विद्यामंदिर शिक्षण संस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ता व माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यांनी वेळोवेळी तक्रार करून आदर्श विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे बांधकाम अनधिकृत असल्याबाबतची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. मेहरबान जिल्हाधिकारी यांनी आदर्श विद्यामंदिर बाबत चौकशी समिती गठित करून अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. आदर्श विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे बांधकाम अनधिकृत असताना देखील काही राजकारणी लोकांनी या अनधिकृत बांधकामावर पडदा टाकण्याचे काम केले आहे. ज्याप्रमाणे इंद्रायणी महाविद्यालयाची विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडण्यात आली त्याचप्रमाणे कुणीतरी आदर्श विद्यामंदिर ची लक्षवेधी लावा रे.. असा उपरोधक टोला.योगेश पारगे, समीर दाभाडे. यांनी लगावला आहे,
इंद्रायणी महाविद्यालया बाबत एक न्याय व आदर्श विद्यामंदिर शिक्षण संस्थेबाबत दुसरा न्याय असा दुजाभावा करून चालणार नाही असे योगेश पारगे, समीर दाभाडे , यांनी नमूद केले आहे.

तळेगाव येथील शासनाच्या जागेतील शासकीय निमशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या विपराव सहकारी गृहरचना संस्थेच्या ४४ गुंठे जागेपैकी २० गुंठ्यात मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे अनधिकृतपणे बांधकाम केले आहे, त्यामुळे शासकीय जागेतील मावळ शिक्षण प्रतिष्ठानची इमारत त्वरित पाडण्याचे आदेश मावळचे तत्कालीन तहसीलदार रणजित देसाई यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी वैभव आवारे यांना नुकतेच दिले होते.

इंद्रायणी महाविद्यालयाच्या कारवाईबाबत एका बड्या राजकीय नेत्याने घेतलेली भूमिका हा केवळ नाट्यमय फार्स असून आपलं ठेवावं झाकून व दुसऱ्याच बघाव वाकून अशीच परिस्थिती असल्याचं योगेश पारगे, समीर दाभाडे, यांनी नमूद केले आहे.

ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये इंद्रायणी महाविद्यालया बाबत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली त्याचप्रमाणे कुणीतरी अनधिकृत बांधकाम असणाऱ्या आदर्श विद्यामंदिर ची अनधिकृत बांधकामाबाबत लक्षवेधी सूचना मांडायला हवी ,परंतु आदर्श विद्या मंदिर बाबत एक न्याय व इंद्रायणी महाविद्यालया बाबत एक न्याय या अशा दुटप्पी भावनेतून करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेचा जनसेवा विकास समिती च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे, तसेच ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्यासारखी कुठलीच कृती कोणीही करू नये असे योगेश पारगे, समीर दाभाडे. यांनी जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!