आरोग्य व शिक्षण

वैकुंठवासी मगनबाई देविशंकर व्यास यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी – ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील.

दशक्रियाविधी निमित्ताने भजन,किर्तन,प्रवचन आणि देणगीचे वाटप

Spread the love

लोणावळा : वैकुंठवासी मगनबाई देविशंकर व्यास यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी , दानशूर गुण समाजाला उभारी देणार आहे , असे ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील यांनी कीर्तनात सांगितले . मगनबाई व्यास यांचे दशक्रियाविधी निमित्ताने भव्य वारकरी वैष्णव मेळावा संपन्न झाला. भजन, किर्तन, प्रवचन आणि लाखो रूपयांच्या देणगीचे वाटप ह.भ.प प्रकाश महाराज बोधले व ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील यांचे हस्ते हॉटेल चंद्रलोक येथे करण्यात आले.

सकाळी नऊ वाजता जगद्गुरू सूर्याचार्यजी द्वारकापीठ (सूर्यपीठ- पिठाधिश्वर ) यांनी मनुष्य जन्माचे सार्थक कसे करून घ्यावे ,यावर भाष्य केले. यानंतर लिटल चँप्स कार्तिकी गायकवाड यांचे संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले यांचे सुश्राव्य प्रवचन झाले. जेष्ट कीर्तनकार ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील यांचे सुश्राव्य किर्तन झाले. यावेळी मृदूंगमणी आबा महाराज गव्हाणे , मृदूंगाचार्य संतोषबुवा घनवट आणि श्रीहरी घनवट यांनी साथसंगत केली. गायनाचार्य प्रविणमहाराज केदारी तसेच गणेशमहाराज पुणेकर यांनी साथ दिली.

यावेळी ह.भ.प.पाटील महाराज म्हणाले , ” कोकण दिंड्यांना दरवर्षी श्रीमंत श्री रमेशचंद्रजी व्यास यांचेकडून अन्नदान व चहापान असते. त्यांनी अनेक धार्मिक कार्यात आई व वडिलांच्याकडून दानधर्म करण्याचा गुण घेतला आहे . समाजात ही परंपरा चालत राहो.

यावेळी ए. वन चिक्की चे मालक रमेशचंद्रजी  व्यास यांचेवतीने स्व.श्रीमती मगनबाई देविशंकर व्यास यांचे स्मृतीप्रित्यर्थ संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान येथे  सभागृहासाठी तीस लाख निधी धनादेशाद्वारे संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्टकडे सुफूर्त करण्यात आली. श्रीराम मँदिर गवळीवाडा चांदीच्या रामदरबार करीता ५ लाख देणगी देण्यात आली . ह.भ.प.नामदेव महाराज आगे संस्थान यांचे पंढरपूर येथील विश्रामधाम सभागृहासाठी ५ लाखांची देणगी देण्यात आली.ह.भ.प.गणेशानंद महाराज पुणेकर यांना गोशाळेसाठी १ लाख देणगी देण्यात आली.ब्राम्हण व आळंदी भक्तांसाठी ५० हजार देणगी देण्यात आली.

या कार्यक्रमाचे स्वागत ए वन चिक्कीचे मालक  रमेशचंद्रजी व्यास यांनी व व्यवस्थापक मफतलाल यांनी केले. सूञसंचालन ह.भ.प . श्री प्रकाश महाराज बोधले , पञकार  निखिल कविश्वर व प्रशांत पुराणीक यांनी केले. तर आभार भजनगायक ह.भ.प.दिलीप लोंढे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!