ताज्या घडामोडी

ओंजळ बहुउद्देशीय संस्थेने केले स्त्री शक्तीला पुरस्कृत

Spread the love

चिमुकल्यांनी केले जागतिक महिला दिनाचे आयोजन

प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात व यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे या विचारांचा आदर्श ठेवून ओंजळ बहुउद्देशीय संस्थेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या दिवशी महिलांना मानाचे स्थान मिळावे या उद्देशातून संस्थेतील पुरुष वर्गाच्या पुढाकाराने संस्था सुशोभित करण्यात आली.
या शुभ प्रसंगी कार्यक्रमाला मंचावर ओंजळ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मा. प्राजक्ता मुते, कोषाध्यक्षा श्रद्धा ताई लुंगे, सदस्या रेणुका मस्कर व वैष्णवी मोटघरे इत्यादी उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.संस्थेचे सदस्य अभिजीत निनावे यांनी संचालन करीत जागतिक महिला दिनाचे महत्व समजावून सांगितले व संस्थेतील महिला सुद्धा प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत असे मत व्यक्त केले. ओंजळ बहुउद्देशीय संस्थेचे सचिव मनोज उईके यांनी संस्थेच्या सदस्य व पदाधिकारी महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्तता केली, महिलेचे स्थान पुरुषाच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहे, हे समजून सांगितले.
तसेच सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. व त्यानंतर संस्थेच्या कोषाध्यक्षा मा. श्रध्दा ताई लुंगे यांनी महिला दिनानिमित्त प्रत्येक महिला या कोणत्याही क्षेत्रात कमी नसून सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत व सर्वांनी प्रथम आईला मानाचे स्थान द्यावे असे आवाहन केले. व इतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
तसेच संस्थेच्या अध्यक्षा मा. प्राजक्ता मुते यांनी अध्यक्षीय भाषणात प्रत्येक महिला या आता पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत व सक्षम महिला ही जीवनात काहीही करू शकते असे विचार व्यक्त केले.
मान्यवरांच्या भाषणानंतर सर्व उपस्थित संस्थेच्या महिला सदस्यांना व ओंजळ बहुउद्देशीय संस्थेच्या लहान चिमुकल्या मुलींना पुरुष वर्गातर्फे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सोबतच मुलांनी संस्थेच्या सदस्य महिलेच्या हाताला रिबीन बांधून आपुलकीची भावना व्यक्त केली ,शाल श्रीफळ देऊन महिलेचा सत्कार हा केला जातो, परंतु ओंजळ संस्थेमध्ये एक आगळावेगळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला, उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले म्हणूनच पाण्याची आवश्यकता ही जास्त भासतेच म्हणूनच प्रत्येक संस्थेच्या महिला वर्गाला पाण्याची बॉटल आणि टिफिन बॉक्स सत्कार स्वरूपात भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण ओंजळ बहुउद्देशीय संस्थेच्या चिमुकल्यांनी केले होते. सोबतच विविध खेळाचे आयोजन केल्या गेले..कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव श्री. मनोज उईके, सौरभ श्रीवास्तव ,विजय सायंकाळ, सदस्य हर्षल परतेकी, सौरभ वाघमारे, उदय पेंदाम, , आलोक भारुडे आदित्य युवनाते, नंदिनी आपुलकर, रक्षा अवजेकर, शबाना शेख, नंदिनी महल्ले ,चौहान, दिपिती अशीया बेग व इतर सदस्यांनी हातभार लावला.
व अशा आनंदमय वातावरणात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!