मावळसामाजिक

भाजे लेणीकडे जाणाऱ्या कारचालकांना औंढेखुर्द पुलाचे बाजूने जाण्यापासून ग्रामीण पोलिसांचा मज्जाव..

बारा किलोमीटर वरून जाण्यास सक्ती.....

Spread the love

भाजे लेणीकडे जाणाऱ्या कारचालकांना औंढेखुर्द पुलाचे बाजूने जाण्यापासून ग्रामीण पोलिसांचा मज्जाव ; बारा किलोमीटर वरून जाण्यास सक्ती.Village police stop motorists going towards Bhaje Caves from passing Aundhekhurd Bridge; Forced to go from twelve kilometers.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी ७ ऑगष्ट.

भाजे लेणीकडे जाणाऱ्या कारचालकांना पवनानगर व औंढेखुर्द पुलाचे बाजूने ग्रामीण पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला.सुमारे चौदा पंधरा किलोमीटर वळसा घालून कारचालकांना लोणावळा, वलवणमार्गे , कार्लाफाटा व मळवलीमार्गे जायला लावत होते. फक्त चार ते सहा किलोमीटर रस्ता असूनही ग्रामीणचे पोलिसांकडून एकविरा लाॕन्स , औंढे पुलाजवळून कारचालकांना भाजे लेणीकडे व मळवलीकडे जावू दिले जात नव्हते.

काही कारचालकांना रस्ता सांगणाऱ्या आवाज न्यूजचे प्रतिनिधीशी येथील पाँईंट वरील पोलिस कर्मचारी जर उध्दटपणे वागणूक देत असतील तर सर्व सामान्य नागरिकांशी कसे वागत असतील.औंढेखुर्द ते मळवली हा रस्ता कोणतीही मोठी वाहतूक कोंडी नसताना पोलिस कर्मचा-यांचे असे वर्तन बेजबाबदारपणाचे आहे.

या रस्त्याची यावेळी छायाचित्रे घेतली असता, एक दोन मोटारसायकल व्यतिरिक्त चिटपाखरूही नव्हते.तरीही पोलिस कर्मचारी येथून या रस्त्याने वाहनचालकांना भाजेलेणीकडे जाण्यास मज्जाव करतात, हा अरेरावीपणा भाजेतील ग्रामस्थांना सांगितला, असता त्यांनी मोठे साहेब भाजेगावात आहेत, त्यांचे कानावर ही गोष्ट घालतो , असे त्यांचेकडून आश्वासन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!